सोमवार, 18 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 26 जानेवारी 2023 (09:40 IST)

Beauty Tips स्लीम व्हायच आहे, तर हे नक्की करा

slim
आजच्या युगातील मुली बारीक होण्यासाठी फिगरच्या बाबतीत खूपच संवेदनशील होत आहेत. आइसक्रीम व चॉकलेट कडे तर त्या पहायलाही तयार होत नाहीत तर ते खाणे तर दूरच! आजकालच्या युवतींनी सडपातळ होण्यासाठी खाण्या-पिण्याचा तर जसा काही त्यागच केला आहे. त्यांच्या या वागण्याने त्यांच्या घरच्यांना त्यांची काळजी वाटू लागली आहे. अशा तरूणींना जर त्यांच्या घरच्यांनी जबरदस्तीने त्यांना खाऊ घातले तर त्या लगेच उलटी करतात, यालाच एनोर्रेक्सिया नारसोवा असे म्हणतात.
 
लोकं ह्या आजाराला आजार न समजता याला सवय समजून याचा कोणताही इलाज करीत नाहीत. एनोर्रेक्सिया नारसोवा नावाचा आजार साइकोसोमेटिकच्या श्रेणीत येतो. जेव्हा मुलींच्यात ह्या रोगाचे प्रमाण वाढते तेव्हा रुग्ण मुलगी इच्छा होऊन सुद्धा काही खाऊ शकत नाही. याचे कारण असे असते की तिला खाण्याबद्दल एक प्रकारची घृणा निर्माण होते. अन्नाच्या वासानेच तिला मळमळायला लागते. अशा मुलींचे सोशल-सर्वक हळूहळू कमी होत जाते. त्या चिडचिडड्ढा होतात, आणि सारखया हाच विचार करतात की आपले वजन वाढणार तर नाही ना! लोकं अशा मुलींना वेडं ठरवू लागतात. काही मुली तर स्लिम ट्रिम बनण्याच्या ओघात वेड्यासारख्या वागतात.
 
लक्षण : 
ह्या रोगाने ग्रस्त मुली खाणे-पिणे खूप कमी करतात आणि त्या खाण्यात कॅलरीजवर जास्तच लक्ष ठेवून असतात.
जर कधी चुकून ह्या रोगाने पीडित मुलीने काही जास्त कॅलरीवाले जेवण केले तर त्याबाबतीत ती खूप वेळ त्या तणावाखाली राहते. 
लैक्सेटिव घेणे ही ह्या रोगाने ग्रासलेल्या पीडितांची सवय होऊन जाते.
एनोरैक्सिया रोगाने त्रासलेल्या मुलीचे वजन कमी होऊ लागते, ज्यामुळे तीव्रतेने तिचे स्वास्थ्य बिघडू लागते.
कमी वयातच ह्या रोगाने पीडीत मुलगी ऑस्टियोपोरोसिस रोगाच्या सापळ्यात अडकली जाते.
ह्या रोगाने ग्रासलेल्या बायकांचा जनन क्षमतेवर सुद्धा प्रतिकूल प्रभाव पडतो ज्यामुळे मुल जन्माला घालण्याच्या क्षमतेत कमतरता येते.
रोगाने ग्रस्त असलेल्या मुलीच्या शरीरात फॉस्पफोरस आणि कॅल्शियमची कमतरता असते, ज्यामुळे तिचे मासिक चक्रात गडबड होते.
काही बाबतीत मुलींना उच्च रक्तदाबाची समस्या पण त्रास देऊ लागते.
थंडीच्या दिवसात रोग झालेल्या मुलीला बर्‍याच समस्यांना तोंड द्यावे लागते.
रोग झालेल्या मुलींच्या आणि बायकांच्या पाठीवरचे केस अचानक वाढू लागतात.
कधी कधी रोग झालेल्या मुलीची अशी अवस्था होते की तिला जास्त भूक लागते तर कधी कधी तिला मळमळायला लागते.
सॅलड व भाजी जास्त खाल्ल्याने व्हिटॅमिन ए मुळे त्वचेत पिवळेपणा येऊ लागतो. तळहातांवर पिवळेपणा जास्त दिसुन येतो.
रोग झालेल्या मुलींच्या आणि बायकांच्या त्वचेवर सुरकुत्या पडायला लागतात.
 
काही न खाल्ल्यामुळे शरीरात सर्व रोग निर्माण होतात. अशा मुलींनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की नियमित जेवणानेच शरीर व्यवस्थित काम करू शकते. आपल्याला खाण्यातूनच प्रोटीन, व्हिटॅमिन, खनिज, कॅलरी, कॅल्शियम हे सर्व मिळते. जर आपण काही खाल्लेच नाही तर हे सर्व आपल्याला कसे मिळणार?
 
अशा मुलींना व्यायाम करायचा असेल तर जरूर करावा, पण हे सर्व तब्बेतीला सांभाळून करावे. जर आजच्या मुलींना वजन कमी करायचे असेल तर त्यांना आपले वजन ह्याप्रकारे कमी करता येईल. 
मुलींना वजन कमी करण्यासाठी योग्य तेवढे जूस आणि पाणी प्यायला पाहिजे.
आळशीपणा सोडून, निसर्गाच्या जास्त जवळ राहून, आर्गेनिक अन्न घेऊन मुली आपले वजन कमी करू शकतात.
मुलींनी ताज्या हवेत जायला हवे.
मुलींनी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे.
फळांचे सेवन करायला हवे.
फाइबर युक्त खाद्य पदार्थ जसे- भात, चपाती, पराठे, बटाटे, गोड, तळलेले-भाजलेले खाद्यपदार्थांचा त्याग करायला हवा. 
वजन कमी करण्यासाठी जेवण अजिबात सोडू नये.
डॉक्टरांचा सल्ला न घेता कधी ही वजन कमी करण्यासाठीची औषधे घेऊ नये.