शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

Hair Serum नारळाचं तेल आणि कोरफडीने या प्रकारे तया करा हेअर सीरम

Home Made Hair Serum केसांची काळजी घेण्यासाठी ऑयलिंग, शैम्पू आणि कंडीशनर इतर वस्तूंचा वापर केला जातो. परंतु आम्ही हेअर सीरमबद्दल विसरुन जातो. हेअर सीरम केसांसाठी पोषक असतं आणि त्यांना फ्रिज फ्री देखील बनवतं. हेअर सीरममुळे केसांमध्ये शाइन येते. तसं तर मार्केटमध्ये अनेक ब्रांड्सचे हेअर सीरम उपलब्ध असतात परंतु ते महागडे आणि केमिकलयुक्त असू शकतात अशात आपण अगदी सोप्या पद्धतीने घरात हेअर सीरम तयार करु शकता. तर चला जाणून घ्या की नारळाचं तेल आणि कोरफडीच्या मदतीने कशा प्रकारे हेअर सीरम तयार केलं जाऊ शकतं-
 
घरी हेअर सीरम तयार करण्याची पद्धत
- 1/2 कप फ्रेश एलोवेरा जेल
- 1 मोठा चमचा नारळाचं तेल
- 1 मोठा चमचा व्हि‍टॅमिन ई तेल
- 1 मोठा चमचा आर्गन ऑयल
- 3-4 थेंब एसेंशियल ऑयल
 
- हेअर सीरम तयार करण्यासाठी एलोवेराच्या पानातून काटेरी कोपरे हटवून त्यातून जेल काढून घ्यावं.
- आता यात नारळाचं तेल, व्हिटॅमिन ई तेल आणि आर्गन तेल मिसळावं.
- आपण यात आपल्या आवडीप्रमाणे एसेंशियल ऑयलचे काही थेंब मिसळू शकता.
- आता याला योग्यप्रकारे मिसळून एका बाटलीत घाला.
- हेअर सीरम गार आणि कोरड्‍या जागेवर स्टोर करा.
 
हेअर सीरम कशा प्रकारे वापरावे?
- हेअर सीरमला केसांवर अप्लाय करण्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील-
- सर्वात आधी केसांना शैम्पू आणि कंडीशन करावे.
- आता जरा हेअर सीरम घेऊन केसांच्या एंड्स वर लक्ष केंद्रित करत नम केसांवर लावावं.
- सीरम लावून केस आणि स्कॅल्पवर हलकी मालीश करावी.
- आता आपण याला असेच राहू देऊ शकतो.