केमिकल शिवाय केसांना नैसर्गिकरीत्या काळे करा
आजकाल लहान वयात केस पांढरे होऊ लागतात. काही लोक केसांना कलर फॅशनमुळे देतात. ज्यामुळे केसांचा मूळ रंग उडतो. ज्यामुळे केस पांढरे होतात. त्यांना लपविण्यासाठी नेहमी केसांना रंग द्यावा लागतो. सतत या केमिकल किंवा रसायनयुक्त रंगांचा वापर करून केसांना नुकसान होत. या मुळे केस कमकुवत होऊन गळू लागतात. जर आपण देखील केसांच्या पांढरे होण्याच्या समस्येने ग्रस्त आहात आणि केमिकलयुक्त रंगांचा वापर करायचा नसल्यास एकदा घरात या प्रकारे केसांना रंग द्या. आपल्याला कधीही रसायनयुक्त रंगाची गरज लागणार नाही. चला तर मग जाणून घेऊ या.
1 मेंदी,दही आणि चहापत्ती -
केसांना लालसर तपकिरी रंग देण्यासाठी हा चांगला पर्याय आहे. या साठी मेंदीमध्ये दही,लिंबाचा रस,आणि पाण्यात चहापत्ती घालून उकळवून घ्या आणि ते पाणी गाळून मेंदीत मिसळून केसांना लावा.नंतर दोन तासाने केस धुऊन घ्या. केस वाळल्यावर तेल लावा आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा केसांना शॅम्पूने धुऊन घ्या.
अशा प्रकारे आपण घरातच मेंदीने बनलेले नैसर्गिक केसांचे डाय अवलंबवून बघा.ज्यामुळे केसांना रंग देखील येईल आणि केस निरोगी राहतील आणि पैसे देखील जास्त खर्च होणार नाही.
2 मेंदी, कडीपत्ता आणि तिळाचे तेल-
केसांना काळे करण्यासाठी हे खूप प्रभावी उपाय आहे तिळीच्या तेलात कडीपत्ता घालून उकळवून घ्या हे मिश्रण एक दोन दिवस तसेच ठेवा. केसांना मेंदी लावताना मेंदीमध्ये हे मिश्रण मिसळून गरम करा आणि केसांना लावून दोन तास तसेच ठेवा. नंतर शिकाकाई किंवा शॅम्पूने केस धुऊन घ्या.
3 कॉफी पावडरसह मेंदी -
केसांना घट्ट तपकिरी रंग देण्यासाठी हा चांगला उपाय आहे. केसांसाठी मेंदी घोळताना त्यामध्ये अर्धा चमचा कॉफी पावडर मिसळा. या मुळे केसांचा रंग कॉफी तपकिरी होईल.
4 कापूर तेलासह मेंदी -
एका लोखंडी भांड्यात कापराचा तेल गरम करा या मध्ये मेंदी चांगल्या प्रकारे मिसळा. एक ते दोन दिवस तसेच ठेवा. लावताना गरम पाणी घाला आणि मग लावा या मुळे केसांचा रंग काळा होईल आणि केस मुळापासून बळकट होतील.