1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

आळशीच्या बिया बनवतील केस सिल्की, जाणून घ्या उपयोग कसा करायचा

Aalshi biya
Hair Care Tips : आजकालच्या बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या जेवण पद्धतीने शरीरावर परिणाम होत आहे. शरीरासोबत केसांवर देखील परिणाम होत आहे. व केसांच्या अनेक समस्या उद्भवत आहे.जर वातावरण बदलत असेल तर केसांची काळजी करणे गरजेचे असते. नाहीतर केस गळायला लागतात. आणि केस कोरडे होऊ लागतात. आळशी ज्याला आपण फ्लॅक्ससीड या  नावाने देखील ओळखतो. आळशीचे सेवन हे केसांना मजबूत करते  आणि सिल्की बनवते. या बियांमध्ये प्रोटीन, ओमेगा -3, फॅटी  एसिड, फाइबर, अँटीऑक्सीडेंट, विटामिन ई, विटामिन बी, मैगनीशियम, मैंगनीज आणि सेलेनियम हे पोषक तत्वे असतात. जे केसांसाठी फायदेकारक असतात. 
 
2 मोठे चमचे आळशी (फ्लॅक्स ) सीड्स
1 कप पाणी 
1 छोटा चमचा एलोवेरा जेल
1 चमचा कोकोनट ऑइल 
आवश्यकतानुसार एसेंशियल ऑइल 
 
कसे वापरावे- 
जर तुम्ही आळशीच्या बियांचा उपयोग करणार आहात तर सगळ्यात आधी पाणी उकळवून त्यात दोन मोठे चमचे आळशीच्या बिया टाका  आता याला 7 ते 8  मिनिट चांगल्या प्रकारे उकळू द्या. पाणी घट्ट होऊ लागले की, गाळून घ्या. मग त्यात एक चमचा एलोवेरा जेल आणि एक चमचा नारळाचे तेल मिसळा. या सर्व वस्तु मिक्स केल्यानंतर त्यात काही थेंब एसेंशियल ऑइल मिक्स करा आता हे एक स्मूद पेस्ट बनुन तयार होईल. 
 
कसे वापरायचे - 
याचा वापर करण्यासाठी सर्वात आधी आपल्या केसांना छोट्या छोट्या भागात विभागून घ्या  या नंतर केसांना लावा. हे जेल चांगल्या प्रकारे केसांना लावल्या नंतर कमीत कमी 20 मिनिट केसांना लावून ठेवा. आता तुम्ही याला चांगल्या प्रकारे धुवून टाका . 
 
हे फायदे मिळतात - 
जर तुमचे केस कुरळे असतील तर याला जरूर लावा. कुरळे  केसांना मऊ करण्यासाठी आळशी किंवा जवसच्या बिया गुणकारी असतात. 
 
आळशीच्या बियांमध्ये विटामिन, पोषक तत्वे, हेल्दी फॅट चे मिश्रण असते. ज्यामुळे केसांचे तुटने व गळणे कमी होते. व केस स्ट्रेट पण दिसतात. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 

Edited By- Dhanashri Naik