शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 31 डिसेंबर 2020 (19:02 IST)

हिवाळ्यात ओठ कोरडे आणि निर्जीव होतात या 5 टिप्स अवलंबवा

हिवाळ्याच्या हंगामात ज्या प्रकारे त्वचेची काळजी घेणं महत्त्वाचे असते त्याच प्रकारे ओठांची निगा राखणे देखील महत्त्वाचे आहे.असं या साठी कारण बदलत्या हवामानामुळे ओठ कोरडे होतात. तसेच ओठ फुटतात देखील. ओठांची काळजी घेण्यासाठी बाजारपेठेत विविध प्रकाराचे लीपबाम देखील मिळतात जे ओठांना मॉइश्चराइझ करण्याचे काम देखील करतात. या लीपबामचा प्रभाव काही काळच असतो नंतर ओठ पुन्हा कोरडे आणि रुक्ष होतात. आज आम्ही आपल्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत ज्यांच्या साहाय्याने आपण हिवाळ्यात आपल्या ओठांची काळजी घेऊ शकता.चला तर मग जाणून घेऊ या ओठांची काळजी घेण्यासाठी  या 5 टिप्स.
 
1 सौंदर्य तज्ज्ञ किंवा मेकअप तज्ज्ञ सांगतात की ओठांवर कोणत्या ही हवामानाचा परिणाम होऊ नये या साठी आवश्यक आहे व्हिटॅमिन ए आणि बी ने समृद्ध पदार्थांचा सेवन करावं. कारण व्हिटॅमिन बी च्या कमतरतेमुळे ओठ रुक्ष आणि कोरडे होतात. या कमतरतेला दूर करण्यासाठी दररोज दूध-दही,हिरव्या पालेभाज्या,लोणी,तूप आणि फळांचे सेवन करावे.
 
2 दररोज रात्री झोपण्याच्या पूर्वी आपल्या ओठांची काळजी घ्या. या साठी रात्री आपल्या नाभी वर साजूक तूप किंवा नारळाचे तेल लावा. असं केल्याने फाटलेले ओठ चांगले होतील आणि ते नरम होतील.
 
3 या शिवाय दररोज झोपण्यापूर्वी ओठांना लोणी किंवा साजूक तूप लावा.अशा प्रकारे सकाळी उठल्यावर देखील करावे.पेट्रोलियम जेलीयुक्त क्रीम देखील लावू शकता.बऱ्याच लोकांचे मत आहे की असं काही दिवस केल्याने बरेच दिवस ओठ मऊ आणि गुलाबी होतात.
 
4 प्रत्येक हंगामात ओठांना निरोगी ठेवणे महत्त्वाचे आहे. या साठी ओठांवर गुलाबाच्या पाकळ्या भिजवून आपल्या ओठांवर चोळा. हे दररोज केल्याने ओठांचा रंग नैसर्गिक गुलाबी आणि चमकदार दिसेल. या शिवाय ओठांचा कोरडेपणा देखील जाईल. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यासह ओठांना देखील पाण्याने स्वच्छ करावे,नंतर कोणत्याही क्रीम किंवा तूपाचा वापर करावा.
 
5 हिवाळ्याच्या हंगामात जास्त थंडी मुळे तहान लागत नाही आणि त्यामुळे उन्हाळ्याच्या हंगामापेक्षा कमी पाणी पितो.या मुळे ओठ रुक्ष आणि फाटलेले दिसतात. म्हणून हिवाळ्यात तहान असो किंवा नसो, पाणी वेळोवेळी पिणे आवश्यक आहे. असं केल्याने ओठ मऊ राहतात आणि कोरडेपणा देखील नाहीसा होईल.