रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

Glowing Skin Tips: चमकदार त्वचेसाठी पाण्यात मिक्स करून सेवन करा 5 वस्तू

आरोग्यदायी आणि चमकदार त्वचा ही सर्वांना आवडते. तसेच हे प्रत्येकाचे स्वप्न असते की आपली त्वचा देखील चमकदार आणि उजळ असावी. एक उजळ त्वचा आपल्याला आनंदी आणि सुंदर दिसायला मदत करते. नेहमीच आपण स्किनकेयर प्रोडक्ट वापरत असतो. पण चमकदार त्वचेसाठी आपल्याला आपला आहार, पेय हे आरोग्यदायी असावे याकरिता लक्ष द्यावे लागेल. चला तर जाणून घेऊ या अश्या आरोग्यदायी टिप्स बद्द्ल. 
 
1. पुदीना- पुदीना त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असतो. यामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सीडेंट्स आणि मेन्थॉल असते, जे त्वचेला शांत करण्याकरिता तसेच सूजने कमी करण्याकरिता आणि चेहरा उजळ होण्याकरिता मदत करते. विशेषकरून, बदलत्या वातावरणात पुदिन्याचे सेवन फायदेशीर असते.   
 
2. ओवा- ओव्यामध्ये अँटीफंगल गुण असतात. ज्यामुळे त्वचा आरोग्यदायी आणि तरूण राहण्यास मदत होते. यामध्ये अँटीऑक्सीडेंट्स पण असतात. ज्यांना चेहऱ्यावर मुरूम येतात त्यांच्यासाठी फायदेशीर असतो. ओव्याचे सेवन त्वचेला होणारे इंफेक्शन थांबवते. याचे सेवन वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. 
 
3. आळीव- आळीवमध्ये ओमेगा-3 फैटी एसिड सोबत विटामिन, मिनरल्स, आणि अँटीऑक्सिडेंट्स असते. जे त्वचेतील ओलावा टिकून ठेवण्यास मदत करते. यामुळे त्वचा हाइड्रेटेड आणि मऊ होते. तसेच चेहरा चमकदार आणि आरोग्यदायी राहतो. 
 
4. लिंबू- त्वचेला उजळ बनव्यासाठी लिंबू फायदेशीर असतो. लिंबूमध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन C असते. जे त्वचेला खराब होण्यापासून वाचवते. तसेच त्वचेला उजळ बनवायला मदत करते. 
 
5. केशर- केशर तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हे त्वचेतील कोलेजनचे प्रमाण वाढायला मदत करते. केशर तुमच्या त्वचेला उजळ करायला मदत करते. केशरला गरम पाण्यात उकळवून हे सेवन करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता,विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik