1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

Hair Growth Tips: महिन्याभरात केस वाढतील या पाच टिप्स अवलंबवा

Hair Growth Tips
Long Hair Tips : नियमित रुपाने केसांना मॉलीश करणे. तसेच केसांना प्रत्येक 3 ते 4 महिन्यात ट्रिम करणे.  
अनेक महिलांना लांब आणि दाट केस आवडतात. लांब आणि दाट केस तुमच्या सौंदर्यात भर घालतात. आजच्या या चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि वाढत्या प्रदूषण मुळे केस गळती समस्या वाढली आहे. तसेच अनेक लोकांच्या केसांची ग्रोथ देखील थांबून गेली आहे. या कारणामुळे त्यांचे केस हे लवकर वाढत नाही. केसांना मोठे आणि घनदाट करण्यासाठी त्यांची काळजी घेणे गरजेचे असते. नियमित रुपाने हे उपाय केल्यावर तुमच्या केसांची ग्रोथ होईल. सोबतच केस तुटने कमी होईल. चला जाणून घेऊ या महिन्याभरात केस लांब कसे होतील. 
 
1. तेलाने मॉलिश करावी- केसांना लांब करण्यासाठी नियमित तेलाची मॉलिश करावी. रोजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपण केसांना तेल लावणे विसरतो आणि तेल न लावता केस धूतो. केसांना निरोगी ठेवण्यासाठी शैम्पू करण्या अगोदर 1ते2 तास पहिले केसांमध्ये तेलाची मॉलिश करणे. तुम्ही नारळाचे तेल, बादाम तेल, रोजमेरी तेल, यांसारख्या तेलाचा वापर करू शकतात. 
 
2. रोज केस धुवू नये-  आजच्या काळात प्रदूषण आणि धूळ-माती यांमुळे आपले केस लवकर खराब होतात. व त्यांना धुण्याची गरज असते. अशामध्ये लोक रोज केस धुतात. किंवा 1 दिवस सोडून केस धुतात. केसांना अधिक धुतल्यास स्कैल्प कमजोर होते. आणि केसांचे मुळ पण प्रभावित होतात. म्हणून आठवड्यातून 1 किंवा 2 वेळेसच केस धुवावे.  
 
3. केळाचे हेयर मास्क लावावे- केस न वाढण्याचे मुख्य कारण दूतोंडी केस असतात. अशामुळे तुम्हाला वारंवार केस कापावे लागतात. या समस्येपासून वाचण्यासाठी नियमित केसांना हेयर मास्क लावावा. या मास्क च्या मदतीने केसांमध्ये दूतोंडी केसांची समस्या कमी होईल. 
 
4. केसांना ट्रिम करणे-  केसांना वाढण्यासाठी आपण वर्ष वर्षभर केसांना ट्रिम करत नाही. पण असे करणे चुकीचे आहे. कारण केसांच्या ग्रोथसाठी केसांना ट्रिम करणे गरजेचे आहे. म्हणून तुम्ही 3-4 महिन्यांनी एकदा केसांना ट्रिम अवश्य करणे. 
 
5. हाइड्रेशन आहे गरजेचे- केस न वाढण्याचे कारण डिहाइड्रेशन पण असते. आपल्या शरीराला पर्याप्त पाण्याची गरज असते. पण खूप वेळेस आपण आपल्या हाइड्रेशन कडे लक्ष देत नाही. शरीरात पाण्याची पातळी कमी असल्यास केसांना कोरडेपण येते. केस तुटण्याचे कारण पाण्याची कमतरता पण असू शकते.   

Edited By- Dhanashri Naik