गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 8 जुलै 2021 (13:13 IST)

Glow Face Serum घरीच तयार करा, सुंदर त्वचा मिळवा

आपल्या शरीरास तंदुरुस्त ठेवणे आणि आपले सौंदर्य राखणे हे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही. अशा परिस्थितीत आपण आपल्या घरातील वस्तूंनी आपल्या सौंदर्याची काळजी घेऊ शकता. यासाठी आपल्याला जास्त सामग्रीची देखील आवश्यकता नाही. चला जाणून घ्या सीरमबद्दल- 
 
सीरम म्हणजे काय
सीरम अत्यंत कॉन्सनट्रेटेड आणि पोषक-घटकांनी समृद्ध उपचार आहे जे त्वचेत चांगल्या प्रकारे शोषलं जातं आणि त्वचेचे संपूर्ण आरोग्य राखण्यास मदत करतं. दररोज वापरण्यासाठी व्हिटॅमिन सी सीरम हा एक उत्तम पर्याय आहे जो बहुतेक प्रत्येक त्वचेच्या प्रकारांना अनुकूल असतो आणि त्वचेच्या विविध प्रकारच्या समस्यांवर उपचार करण्यास देखील मदत करतो.
 
या प्रकारे करा तया 
ग्लिसरीन, गुलाब पाणी आणि लिंबूपासून बनविलेले होममेड सीरम त्वचेला चमकत राहण्यासाठी आणि डाग-मुक्त ठेवण्यासाठी सर्वोत्तम आहे.
 
ग्लिसरीनमध्ये मॉइस्चरायझिंग गुणधर्म असतात, गुलाबाचे पाणी ऐस्ट्रिंजेंट रुपात काम करतं तर लिंबामध्ये ब्लीचिंग गुणधर्म असतात. या तिघांना एकत्र करून, आपण हे काही दिवसांसाठी स्टोअर करु शकता.
 
हे सीरम तयार करण्यासाठी ग्लिसरीनचे 5 ते 6 थेंब 20 मिलीलीटर गुलाब पाण्यात मिसळा. त्यात एक लिंबू पिळून घ्या. त्यांना चांगले मिसळा आणि साठवा.
 
जर त्वचा अधिक कोरडी असेल तर ग्लिसरीनचे प्रमाण वाढवा आणि आपण त्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूल देखील घालू शकता.
 
हे ग्लिसरीन सीरम लावण्यासाठी रात्रीचा काळ उत्तम आहे. झोपेच्या आधी हा सीरम लावा आणि सकाळी धुवा.