व्यक्तिमत्त्वाला शोभणारे कपडे निवडण्याइतकंच महत्त्व दागिन्यांच्या निवडीलाही द्यायला हवं. पाहा आपल्या चेहर्यावर कोणते दागिने शोभून दिसततील:
गोल चेहरा
गोल चेहर्याच्या महिलांनी नेकलाईनच्या खाली येणारं नेकलेस निवडायला हवा. त्यांनी लांब, सरळ कानातली निवडायला हवीत. गोलाकार मण्यांचे दागिने गोल चेहर्याला शोभून दिसत नाही. चौकोनी, लंबगोल कानातल्यांमुळेही गोल चेहरा उठून दिसेल. टियरड्रॉप प्रकारची गोल कर्णभूषणे चेहर्याला सर्वाधिक शोभून दिसतील.