रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

एक फळ रोज खा, ब्युटी क्वींसला लाजवेल अशी शाइनी स्किन मिळवा

फळ आमच्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असतात परंतू काही फळ असे असतात ज्यांनी त्वचा सुंदर होते. तर आज आम्ही आपल्याला अशाच एका फळाबद्दल सांगू ज्याचे सेवन केल्याने चेहरा चमकेल.
 
आम्ही सांगत आहोत किवी फळाबद्दल. तर जाणून घ्या की किवी फळ कशा प्रकारे आपली सुंदरता वाढवू शकतं. यात आढळणार्‍या व्हिटॅमिन-इ मुळे त्वचा सुंदर होते. किवी फायबरदेखील आढळतं ज्यामुळे त्वचेचं आरोग्य टिकून राहतं.
 
दररोज एक किंवा दोन किवी खाल्ल्याने आपण निरोगी राहू शकता आणि याने त्वचेवरील डाग देखील नाहीसे होतील. त्वचा नरम आणि शाइनी दिसू लागेल.
 
किवी मध्ये अँटीबॅक्टीरियल आढळतात ज्याने त्वचेवरील पुरळ आणि त्वचासंबंधी इतर समस्या नाहीश्या होतात.