मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 4 जुलै 2020 (11:55 IST)

Skin Tightening Tips : तरुण दिसण्यासाठी 5 सोप्या टिप्स

साधारणपणे सरत वय सर्वात आधी चेहऱ्यावर दिसून येतं, ज्यामुळे आपले सौंदर्याचा जादू कमी होतोय असं वाटू लागतं. आपलं सौंदर्य टिकवून ठेवायचे असल्यास, चेहरा सैल पडता कामा नये आणि यासाठी वाचा 5 सोप्या टिप्स 
 
1 एस्ट्रिंजेंटचा वापर : त्वचेच्या टोनर सारखेच एस्ट्रिंजेंट देखील त्वचेसाठी फायदेशीर आहे. बाजारपेठ्यात हे सहजरित्या उपलब्ध असतं. खरं तर दररोज एस्ट्रिंजेंटचा वापर आपल्या त्वचेच्या तंतूंना बांधून ठेवण्यासाठी करता येतं. याने सुरकुत्या येत नाही. 
 
2 पाणी : पाणी प्यायचा संबंध निव्वळ आरोग्याशी नव्हे तर त्वचेशी देखील आहे. दिवसभरातून किमान 10 ते 12 ग्लास पाणी पिण्यामुळे त्वचेस सैल होण थांबत आणि तजेल दिसण्यात मदत ‍होते. 
 
3 व्यायाम : त्वचा टाईट राहावी यासाठी चेहऱ्याच्या व्यायामावर लक्ष द्या. जेणे करून त्वचेच्या त्या पेश्या देखील सक्रिय होतात ज्यांचा वापर बऱ्याच काळापासून झाला नाही. चेहऱ्याचा व्यायाम केल्याने आपले गाल, डोळ्यांच्या ओवतीभोवती, ओठ, मान, आणि कपाळाजवळची त्वचा टाईट होऊ लागते. 
 
4 काकडी : हे सैल त्वचेवर एक उत्तम उपाय आहे. या साठी काकडीचा रस काढून आपल्या चेहऱ्यावर लावावं. जेव्हा हे एका थराच्या रूपात वाळेल, आपला चेहरा धुवून घ्या. डोळ्याच्या भोवती हे लावल्याने सुरकुत्या, काळे वतुर्ळ आणि डोळ्याची सूज कमी करण्यास फायदेशीर आहे. 
 
5 मालिश : चेहऱ्याची मसाज केल्याने नैसर्गिक चमक येते. आपण कोरफडाचा पल्प काढून त्याने आपल्या चेहऱ्याची मालिश करू शकता. हे त्वचेस टाईट राहण्यास मदत करतं. या व्यतिरिक्त नैसर्गिक तेलांपासून देखील आपल्या चेहऱ्याची मालिश करणं फायदेशीर ठरेल.