1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Updated : गुरूवार, 18 एप्रिल 2024 (16:26 IST)

टोमॅटोच्या फेसमास्कमध्ये लपले आहे सौंदर्याचे रहस्य

tomato benefits
उजळ आणि चमकदार त्वचा ही प्रत्येकाला आवडते. प्रत्येक व्यक्ती आपल्या त्वचेला उजळ आणि चमकदार बनवू इच्छत असतो. त्वचेला आरोग्यदायी आणि सुंदर बनवण्यासाठी अनेक उपाय करत असतो. पण या उपायांनी काही फरक पडत नाही. जर तुम्हाला नैसर्गिक सुंदरता, स्वच्छ त्वचा हवी असेल तर वापरून पहा टोमॅटोचा फेसमास्क 
 
कसा करावा टोमॅटोचा उपयोग
टोमॅटोचे ज्यूस करून रोज चेहऱ्यावर लावावे. यामुळे चेहऱ्यावरील एक्स्ट्रा ऑइल निघण्यास मदत होईल. 
 
एक चमचा बेसन, अर्धा चमचा साय, अर्धा चमचा मध आणि 2 चमचे टोमॅटो रस यांना एकत्रित मिक्स करावे. आता या पेस्टला पूर्ण चेहऱ्यावर लावावे. मग स्वच्छ पाण्याने चेहऱ्याला धुवून घ्यावे. या फेसमास्कचा उपयोग आठवड्यातून दोन वेळेस करू शकतात. 
 
अर्धा टोमॅटो घेऊन ब्लॅकहेड्स वर लावल्यास त्वचा ब्लॅकहेड्स मुक्त होते. 
 
टोमॅटोचा फेसमास्क चेहऱ्यावर लावण्याचे फायदे 
टोमॅटोचा फेसमास्कमुळे चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या कमी होतात. याकरिता टोमॅटोचा उपयोग नियमित करावा . हे तुमच्या त्वचेला उजळ बनवायला मदत करतो. 
 
त्वचेला ताजे ठेवायचे असल्यास टॉमेटोचा उपयोग करावा. टोमॅटो तुमच्या त्वचेला ताजे ठेवण्यास मदत करतो. 
 
टोमॅटोमध्ये मध्ये असलेले व्हिटॅमिन C त्वचेला स्वच्छ करण्यास मदत करते. 
 
त्वचेला स्वच्छ आणि उजळ, पिंपल्स मुक्त करण्यासाठी टोमॅटो फायदेशीर असतो. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik