गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 डिसेंबर 2019 (11:13 IST)

चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी घरी तयार करा पॅक

जेष्ठमधाची मुळं त्वचेची उन्हात सूर्य विकिरणांपासून रक्षण करते. हे वापरल्याने रंग उजळण्यास मदत होते. लिंबू त्वचेचा रंग उजळवून त्वचेवरच्या सुरकुत्यांना कमी करतो.
 
त्वचेच्या आयुर्वेदिक उपचारांसाठी लिंबू आणि जेष्ठमधाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. नियमितपणे ह्यांचा वापर केल्यास सौन्दर्यात वाढ होते.
 
आयुर्वेदिक पद्धतीने त्वचेची काळजी घेण्यासाठी फेस पॅक  
2 चमचे जेष्ठमध पावडर, 2 चमचे लिंबाचा रस एकत्र करून पेस्ट करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून वाळू द्या. नंतर 30 मिनिटाने गार पाण्याने चेहरा धुऊन घ्या.