सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By
Last Updated : शनिवार, 26 सप्टेंबर 2020 (14:26 IST)

फेस मास्क वापरताय?

चेहर्‍याच्या समस्या दूर करण्यासोबतच मुलायम त्वचा आणि उजळपणासारखे लाभ मिळवण्यासाठी आपण फेस मास्क लावतो. पण बरेचदा या फेस मास्कचे लाभ मिळत नाहीत. फेस मास्क लावताना होणार्या‌ चुकांमुळे असे होते. फेस मास्कचा वापर करताना होणार्या चुकांविषयी...
* त्वचेच्या प्रकारानुसार फेस मास्कची निवड करायला हवी. फेस मास्क लावताना आपण त्वचेकडे लक्षच देत नाही आणि तिथेच सगळी गडबड होते. कोरड्या त्वचेसाठी ओलावा देणारा म्हणजेच हायड्रेटिंग फेस मास्क हवा. तेलकट त्वचेसाठी मेटिफाय क्ले मास्क अधिक उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे फेस मास्क लावण्याआधी आपल्या त्वचेचा पोत जाणून घ्या.
* मास्क लावण्याआधी चेहरा आणि हात स्वच्छ धुवून घ्या. अस्वच्छ हातांनी फेस मास्क लावल्यास धुलीकण, जंतू चेहर्याकवर बसतात. यामुळे चेहर्याावर मुरूमं, पुटकुळ्या येऊ शकतात.
* फेस मास्क तयार करताना वापरल्याजाणार्याम घटकांच्या प्रमाणाकडेही लक्ष द्या. मास्क कमी प्रमाणात तयार झाले असेल तर तुम्हाला सर्व लाभ मिळणार नाहीत. तसेच अतिरिक्त मास्कमुळे त्वचा खेचल्यासारखी वाटेल. हे टाळण्यासाठी चेहर्यातवर मास्कचा समान थर द्या.
* चेहर्यारवरील मास्क वाळल्यानंतर लगेच धुवून टाका. मास्क बराच काळपर्यंत ठेवल्यास त्वचा कोरडी पडून खेचल्यासारखी वाटते. मास्क जास्त काळ ठेवल्याने अधिक लाभ होतात हा एक गैरसमज आहे. यासोबतच फेस मास्कची पॅच टेस्ट करून बघा. त्वचा लाल होणे, मुरूमं येणे अशा समस्या उद्‌भवल्या नाहीत तर पुढे जा.
प्राजक्ता जोरी