शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020 (13:53 IST)

इंटरनेट वापरताय, मग व्यक्तिगत माहितीची गोपनीयता राखण्यासाठी नक्की वाचा

आपण इंटरनेट वापरत असल्यास आम्ही आपल्याला काही इंटरनेट सेफ्टी पॉइंट्स बद्दल सांगणार आहोत. त्यांचा वापर करून आपण स्वतःला इंटरनेटच्या जगात सुरक्षित ठेवू शकता. 
 
एकीकडे, सध्याच्या लॉकडाऊन काळात इंटरनेट बऱ्याच लोकांसाठी आधारच बनलेला आहे. तर दुसरीकडे हॅकिंगशी निगडित प्रकरणे देखील वाढत आहे. आणि आजकालं हॅकर्स त्या यूजर्स वर हल्ला करीत आहे जे या काळात सर्वात जास्त इंटरनेटचा वापर करीत आहे. 
 
कधी एखाद्याचा डेटा चोरीला जातो, तर कधी खाते हॅक होतं. तर कधी बँकेचे पासवर्ड आणि पिन चोरीला जातं. अश्या परिस्थितीत प्रश्न उद्भवतो की इंटरनेटवर आपल्या स्वतःला आणि आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंट्सचं संरक्षण कसं करू शकतो. तर आज आम्ही आपल्याला याच प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी काही इंटरनेट सेफ्टी पॉइंट्स सांगत आहोत. ज्या आपण पाळल्यास आपल्याला या समस्यांचा सामना करावा लागणार नाही.  
 
1 ऑपरेटिंग सिस्टम - 
सर्वप्रथम आपण आपल्या लॅपटॉप आणि कॉम्प्युटरमधून असे ऑपरेटिंग सिस्टम काढून टाका जे आपल्या काही कामी येतं नाही. आपल्या सिस्टम मध्ये तेच सॉफ्टवेअरच ठेवा जे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर घेताना आपल्याला मिळाले आहेत. कधी कधी असे होते की सिस्टम मध्ये टाकलेल्या अतिरिक्त सॉफ्टवेअरची ती प्रत पायरेटेड असते. जी आपल्याला अडचणीत टाकू शकते. शक्य असल्यास मूळ सॉफ्टवेअरच आपल्या सिस्टम मध्ये ठेवा.
 
2 एड आणि ब्राऊझिंग कुकीज अवरोधित किंवा ब्लॉक करावं -
आपल्या सिस्टमचा डेटाला सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वात आधी आपण ब्राऊझिंग कुकीज अवरोधित किंवा ब्लॉक कराव्यात. जर आपण कधी लक्ष दिले असल्यास आपण एखादी साईट उघडतातच त्या पृष्ठावर किंवा पेज वर बऱ्याच जाहिराती दिसू लागतात. या एड आणि कुकीजचं आपली माहिती इतर साईटला देऊ शकतात, या मुळे आपली गोपनीयता कधीही धोक्यात येऊ शकते.
 
3 पब्लिक किंवा सार्वजनिक वाई फाई स्वीकारू नये- 
सहसा हे बघितले जाते की लोकांना सार्वजनिक वाई-फाई चे नेटवर्क मिळत असल्यास ते लगेच आपले सिस्टम ला कनेक्ट करतात. असे करू नये जर आपण ही चूक करीत असाल तर या मुळे आपले सिस्टम हॅकिंगचे शिकार होऊ शकतात. कारण ते वाई फाई ओपन नेटवर्कचे आहेत. 
 
4 ब्राऊझिंग हिस्ट्री डिलीट करावी - 
आपण जेव्हा एखाद्या दुसऱ्या सिस्टीमने किंवा मोबाईलने लॉग इन करता, तेव्हा आपले काम झाल्यावर नेहमीच ब्राऊझिंग हिस्ट्रीला डिलीट करावं. लोकं असे करीत नाही त्यामुळे नंतर समजते की त्यांची वैयक्तिक माहिती चोरी झाली आहे किंवा लिंक झाली आहे. म्हणून जेव्हा पण आपण पुढच्या वेळी दुसऱ्या सिस्टमला वापराल नंतर ब्राऊझिंग हिस्ट्रीला न विसरता डिलीट करा.
 
5 URL लक्षात ठेवा - 
जेव्हा पण आपण एखादी वेबसाइट उघडता तेव्हा आपण त्या पेज वरील URL वर लक्ष देणं महत्त्वाचं आहे. आपल्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की एखाद्या सुरक्षित साईट्सच्या पेज ची सुरुवात नेहमीच https पासून होते. आपल्याला जर असं आढळले नसल्यास त्या वेबपेज ला उघडू नये.
 
6 मेल किंवा मेसेजेसला दुर्लक्ष करावं - 
आपण बघितलेच असणार की नेहमीच अनावश्यक असलेले मेल आणि मेसेजेस येतात. की या मेल किंवा मेसेजेस ला रिप्लाय करा आणि जिंका एक लाख रुपये किंवा लोन किंवा लॉटरी जिंकण्यासाठी या लिंक वर क्लिक करा. नेहमी अश्या मेल किंवा मेसेजेस ला दुर्लक्ष करावं  त्याच बरोबर आपल्या पास वर्ड कडे देखील लक्ष द्यावं. आपल्या पासवर्ड मध्ये कॅपिटल लेटर, स्मॉल लेटरसह स्पेशल केरेक्टेर आणि नंबर असणं आवश्यक असतं.