शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. श्रद्धा -अंधश्रद्धा
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By
Last Updated : शुक्रवार, 22 ऑगस्ट 2014 (15:38 IST)

कशी ही आस्था? पाहाल तर अंगावर काटे येतील (व्हिडिओ)

मध्यप्रदेशाला लागून गुजरातच एक गांव. एक इसम संगीतावर नृत्य करीत आहे. या व्यक्तीने पुरुषाचे कपडे धारण केले आहे पण वरून एक साडी देखील ओढली आहे. याला तुम्ही तांत्रिक म्हणा किंवा बाबा काहीही चालेल. अशी विचित्र पद्धतिने मुलांना रोगमुक्त करण्याचा दावा करतो.   
 
याचा हातात एक लहान बाळ लटकत आहे. ज्याला हा फारच निर्दयतेने कधी वर तर कधी गोल गोल फिरवत आहे. हे सर्व बघून अंगावर काटे येतात. पण या माणसाच्या चेहर्‍यावर थोडे ही खंत नाही आहे.  
 


दुर्भाग्याने अंधविश्वासाचे शिकार काही लोकं संगीतावर ताळ्या ठोकत आहे. मूल जर रडत ही असेल तर एवढ्या गर्दीत आणि आवाजात त्याचं ओरडणं ऐकणार कोणीच नाही. ज्याप्रकारे मुलाला गोल गोल फिरवलं त्याने त्याचा जीवही जाऊ शकतो किंवा त्याच्या शरीराला इजा ही होऊ शकते. हा व्यक्ती शेवटी मुलाची पापी घेतो आणि त्याचे टिळक करतो.  
 
आता तुम्हीच सांगा की अशा प्रकारे कुठल्याही मुलाचा इलाज होऊ शकतो का? असल्या प्रकारचा इलाज केल्याने तर मुलाचा जीव देखील जाऊ शकतो.