शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा
  4. »
  5. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By वेबदुनिया|

मांजरावर प्रेम करणारी कुत्री

श्रध्दा- अंधश्रध्दाच्या भागात आतापर्यंत आपण वि‍विध घटनांचा वेध घेतला. परंतु आज आम्ही आपल्याला जरा वेगळीच माहिती देत आहोत. मनुष्य आणि प्राणी यांच्यात असलेले प्रेम आपण पाहतोच.

अनेकवर्षांपासून मनुष्य आणि प्राणी एकमेंकासोबत रहात आले आहेत. परंतु प्राण्याविषयीची आपुलकी ही फारकाळ टीकत नाही असे म्हणतात.

मांजर आणि कुत्रा यांच्यातील शत्रुत्व जगजाहीर आहे. मांजर दिसताक्षणी तिच्या नरडीचा घोट कधी घ्यावा, असा प्रश्न त्या कु्त्र्याच्या मनात येणे स्वाभाविकच नाही का? परंतु बिल्लू नामक एका कुत्रीने नेन्सी नावाच्या मांजरला आपल्या पोटच्या पोराप्रमाणे तिचे पालणपोषण केले हे ऐकुण आपल्याला आश्चर्य वाटेल.

WD
मध्य प्रदेशातील इंदूर येथील एका कुटुंबाजवळ चार वर्षांपासून बिल्लू कुत्री आहे. त्यांना त्यांच्या एकेदिवशी एक लहान अनाथ मांजर सापडली. ती अगदी बिल्लूसारखीच दिसते. त्यांनी तिला घरी आणली. बिल्लु तिला त्रास देईल का ? अशा भितीने कुटुंबातील सदस्यांची मात्र झोप उडाली.

त्यांची ही भीती त्यांच्या या कुत्रीने खोटी ठरवली. काही दिवसांमध्ये तिच्यात बदल दिसून आले ती या मांजराला आपल्या पिलांप्रमाणे जपू लागली. डोळेकर कुटुंबीयांनी या घटनेची माहिती डॅक्टरांना दिली. प्राण्यांवरही सायकॉलॉजीकल प्रभाव पडत असतो, हाही त्यातलाच एक भाग असल्याचे डॉक्टरांनी यावेळी स्पष्ट केले.

त्यांचे प्रेम फारकाळ टिकले नाही केवळ दहा ‍महिन्यातच त्या मांजराचा मृत्यू झाला आणि कुटुंबावर मोठा आघात झाला. मांजराच्या मृत्यूचे त्या कुत्रीलाही बरेच दु:ख झाले. नंतर डोळेकर कुटुंबीयांनी त्या मांजरावर एखाद्या मनुष्याप्रमाणे अंत्यसंस्कार केले.