testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

नेत्रसुखद पक्षीजीवन

bird
वेबदुनिया|
PR
मराठी ब्लॉगविश्वाचा परिघ चांगलाच रूंदावतोय. नवनवीन आणि वेगवेगळ्या विषयांचे ब्लॉग मायबोलीत सुरू झाले आहेत. नेटवर फेरफटका मारताना एक चांगला आणि वेगळ्या विषयावरचा ब्लॉग सापडला. मागे फुलपाखरांवरच्या युवराज गुर्जरच्या ब्लॉगची माहिती या सदरात दिली होती. यावेळी पक्ष्यांची माहिती देणार्‍या 'भटक्या विमुक्त उनाड' या ब्लॉगची माहिती देणार आहे. > या ब्लॉगचा लेखक आहे 'पम्या'. रहाणार शहर पुणे. आवड पक्षीनिरिक्षण आणि त्या पाठोपाठ येणार्‍या भटकंतीची. त्यामुळे हा ब्लॉग माहितीपूर्ण तर आहेच. पण तितकाच नेत्रसुखदही. पम्यातला पक्षीनिरिक्षक, भटक्या आणि उत्तम छायाचित्रकारही या ब्लॉगमधून दिसून येतो. २००६ मध्ये त्याने हा ब्लॉग सुरू केला. ब्लॉगवरच्या नोंदी विरळ असल्या तरी त्यात काही एक नियमितता आहे. मुख्य म्हणजे माहिती आहे. > सामान्यपणे आपल्याला पक्ष्यांविषयी फारशी माहिती नसते. असलीच तर ती आजूबाजूच्या रोजच्या वावरण्यातल्या पक्ष्यांचीच. त्यापलिकडे आपल्या माहितीचं आकाश विस्तारत नाही. पम्या मुळातच पक्षीनिरिक्षक असल्याने वेगळे पक्षी त्याच्या ब्लॉगमधून भेटायला येतात. पक्ष्यांची छायाचित्रे दाखवून पम्या थांबत नाही, तर त्यांची माहिती, वैशिष्ट्ये आणि त्याला आनुषांगिक अशी इतर माहितीही तो देतो.

blog
PR
वैशिष्ट्य म्हणजे माहिती देताना ती गद्य स्वरूपातच असली पाहिजे असेही नाही. उदा. त्याने बहिरी ससाण्याचा एक फोटो टाकून त्याच्याविषयी जुनून या म्युझिकल ग्रुपने तयार केलेलं गाणंच दिलं आहे. ससाण्याची वैशिष्ट्य त्यातून दिसून येतात. ससाण्याला हिंदीत शाहीन म्हणतात. या शाहीविषयी या गाण्यात म्हटलंय.
तू शाहीन है, परवाझ है काम तेरा, काम तेरा
तेरे सामने आसमां और भी है, और भी है

तू शाहीन है, बसेरा कर, पहडों की चट्टानों पर
तू शाहीन है! तू शाहीन है! तू शाहीन है!

ससाण्याचं किती मार्मिक वर्णन यात केलंय नाही? दरवर्षी रोहित अर्थात फ्लेमिंग पक्षी आल्याचं चित्र जवळपास सर्व वर्तमानपत्रात प्रसिद्ध होतं. या पक्ष्याविषयी छान माहिती पम्यानं दिलीय. फ्लेमिंगो या नावाच खुलासा अनेकांना ते नाव अनेकदा उच्चारूनही माहित नसतो. फ्लेमिंगोला मराठीत अग्निपंख किंवा रोहित पक्षी असं म्हणतात. हा पक्षी उडत जाताना ज्वाळाच उडत जातेय की काय असे वाटते म्हणून Flamingo (Flame is going) असे त्याला म्हटले जाते.

blog
PR
महाराष्ट्रात दोन प्रकारचे फ्लेमिंगो दिसतात. एक ग्रेटर व दुसरे लेसर. लेसर फ्लेमिंगो मुंबईत शिवडी बंदरात आढळतात आणि ग्रेटर फ्लेमिंगो पुण्याजवळ, भिगवण, सातार्‍याजवळ मायणी, वीरेश्वर तलाव आदी ठिकाणी सापडतात, अशी माहिती तो देतो. त्याच्या स्थलांतराची कारणं म्हणजे अन्न हेच असल्याचंही त्याने नमूद केलंय. या पक्ष्याचे वेगवेगळ्या एंगलमधले फोटो इथे पहायला मिळतात.

सासवडच्या एका सफरीत आढळलेल्या पक्ष्यांची छान माहितीही त्याने दिलीय. त्यात क्वेल, वेडा राघू, होला, सिंगींग, बुशलार्क, विष्फुल्लिंग नर आणि मादी यांची अतिशय देखणी चित्रे या नोंदीत आहेत. विष्फुल्लिंग या पक्ष्याचे घरटे सापडल्यानंतर त्याचे निरिक्षण करण्याचा अनुभवही छान वाटतो. पक्षीनिरिक्षणातील काही संकल्पनाही या निमित्ताने समजून येतात. उदा. टाईम बजेटिंग करणं. टाइम बजेटिंग म्हणजे नर आणि मादी किती वेळ घरट्यावर असतात? किती वेळा अन्न आणले जाते? कोण भरवते? अंडी कोण उबवते? नर किती वेळ गाणी म्हणतो? या सगळ्याचा आलेख.


यावर अधिक वाचा :