रेल्वे तिकिट कन्फर्म नसल्यास करा विमानाने प्रवास
नवी दिल्ली- सार्वजनिक क्षेत्रातील विमानन कंपनी एअर इंडिया आता राजधानी ट्रेनच्या अश्या यात्रेकरूंना प्रवास उपलब्ध करवेल ज्यांचे तिकिट कन्फर्म झाले नाही. मर्यादित कालावधीसाठी या विशेष योजनेत एअर इंडिया द्वारे अश्या लोकांना एसी फर्स्ट क्लासच्या भाड्यात प्रवासाची सोय उपलब्ध होईल.
एअर इंडिया ने दिलेल्या माहितीप्रमाणे राजधानी एक्सप्रेसचे प्रवाशी उड्डाण सुटण्याच्या चार तासाआधी तिकिट बुक करू शकतात. वेटिंग लिस्ट मध्ये असलेल्या प्रवाशांना फर्स्ट एसीचे भाडे भरावे लागेल.
आपल्या ‘सुपर सेव्हर’ योजनेत एअर इंडियाच्या घरगुती मार्गावर इकनॉमी क्लासमध्ये ही सुविधा उपलब्ध राहील. ही योजना 26 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत लागू आहे.
सध्या भारतीय रेल्वे नेटवर्कवर दररोज 21 राजधानी एक्सप्रेस ट्रेन चालतात. दररोज याने 20,000 प्रवाशी प्रवास करतात.