शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

530 रुपयांत मिळवा 10 लाखांचा इन्शुरन्स!

जगभरात होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांनी प्रत्येक जण मनातून धास्तावलाय. त्यामुळे ‘टेरर इन्श्युरन्स’ हा एक चांगला पर्याय ठरणार आहे. भारतात ‘टेरर इन्श्युरन्स’खाली केवळ 530 रूपयांत 10 लाख रूपयांचं कव्हर मिळू शकेल. 
 
पॅरीसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर इन्श्युरन्स कंपन्या नव्याने या इन्श्युरन्सचा प्रचार करायला लागली आहेत. पॅरीसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात झालेल्या जीवितहानीची भरपाई कोणी करू शकणार नाही. पण, भविष्यात देव न करो पण तुमच्यासोबत असा काही प्रकार घडला तर त्याची आर्थिक भरपाई इन्श्युरन्स कंपन्या करू शकतील. पॅरीस हल्ल्यानंतर देशातल्या जनरल इन्श्युरन्स कंपन्याने नव्याने टेररिस्ट इन्श्युरन्सचा प्रचार करायला लागल्या आहेत. खरं म्हणजे जनरल इन्श्युरन्स कंपन्या ‘टेरर इन्श्युरन्स’ला ‘हाऊसिंग इन्श्युरन्स’शी जोडतात. त्याचा प्रीमियमही खूप स्वस्त असतो. उदाहरणार्थ ‘तुम्ही एक लाख रूपये सम एश्युअर्डची हाऊसिंग पॉलिसी घेतली तर त्याला फक्त 45 रूपये प्रीमियम पडेल. यात जर तुम्ही टेररिस्ट इन्श्युरन्स अँड केला तर त्यात फक्त 8 रूपये जास्त द्यावे लागतील. म्हणजेच 10 लाख रूपयांची हाऊसिंग पॉलिसी घेतलीत तर फक्त 530 रूपये प्रीमियम लागेल. वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरात या विम्याची मागणी वाढली. मात्र, याची व्याप्ती अजूनही मोठी हॉटेल्स, एअरपोर्ट, स्टेशन्स, मंदिरं, चर्चेस यापुरतीच मर्यादित आहे. 
 
सर्वसाधारणपणे हल्ल्यात प्रॉपर्टीचं नुकसान, जीवितहानी, किमती मालाचं नुकसान याची भरपाई देते. भारतात ‘ताजमहाल’ हॉटेलवर झालेल्या हल्ल्यात इन्शुरन्स कंपन्यांनी आजवरचा सर्वाधिक म्हणजे 370 कोटी रूपयांचा क्लेम ताज ग्रुपला दिला होता. देशातली इन्श्युरन्स कंपनी जीआयसी आरईने याआधीच टेररिस्ट इन्शुरन्स पूल तयार केलाय. सर्व जनरल इन्शुरन्स कंपन्यांचा प्रीमियम या पूलमध्ये जमा होतो. सध्या हा पूल 500 कोटींचा आहे. जेवढे जास्त ग्राहक टेररिस्ट इन्शुरन्स खरेदी करतील तेवढा या पूलचा आकार वाढेल.