testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आता ‘यूआयडीएआय’ने व्हर्च्यूअल आयडी सुरू होणार

Last Modified गुरूवार, 11 जानेवारी 2018 (09:40 IST)

आधारकार्डच्या सुरक्षेच्या पार्श्‍वभूमीवर आता ‘यूआयडीएआय’ने व्हर्च्यूअल आयडी सुरू करण्याची घोषणा केली आहे. व्हर्च्यूअल आयडी 16 अंकांचा असणार आहे. ओळखपत्रासाठी व्हर्च्यूअल आयडीची वापर होणार आहे. त्यामुळे 119 कोटी आधारकार्डधारकांची खासगी आणि गोपनीय माहिती सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे. मार्च 2018 पासून व्हर्च्यूअल आयडीचा अंमल होणार आहे.

येत्या मार्च महिन्यापासून व्हर्च्यूअल आयडीची सुरुवात केली जाईल. मात्र, जूनपासून अनिवार्य केले जाईल. ज्या यंत्रणा या व्हर्च्यूअल आयडीच्याद‍ृष्टीने सुविधांमध्ये बदल करणार नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. सध्या जे आधारकार्ड आहे, त्यात एकूण 12 अंक असतात. मात्र, व्हर्च्यूअल कार्डमध्ये 16 अंक असतील.

सिमकार्ड व्हेरिफिकेशनसह विविध योजनांसाठी या व्हर्च्यूअल आयडीचा वापर करू शकतील. आधारकार्डधारकांना वेबसाईटवरून हा आयडी तयार करता येईल. हा क्रमांक तात्पुरता असेल. नव्याने व्हर्च्यूअल आयडी काढता येणार आहे. हा क्रमांक बदलताही येईल. त्यामुळे आधारक्रमांक
द्यावा लागणार नाही.

कुणीही नागरिक ‘यूआयडीएआय’च्या वेबसाईटवर (https://uidai.gov.in)जाऊन आधीच्याच आधारकार्डच्या माहितीवरून व्हर्च्यूअल आयडी बनवू शकतो. 16 अंकांचा हा व्हर्च्यूअल आयडी ठराविक वेळेपुरता मर्यादित असेल. त्यामुळे मुदतीनंतर पुन्हा नवीन व्हर्च्यूअल आयडी बनवावा लागेल. व्हर्च्यूअल आयडीतून बँक किंवा फोन कंपन्यांना नागरिकांची केवळ मर्यादित माहिती (नाव, पत्ता, फोटो) मिळेल. एवढीच माहिती त्यांना गरजेची असते. व्हर्च्यूअल आयडीही ओळखपत्र म्हणून वापरले जाऊ शकते. केवायसी करायचे असेल, तिथेही व्हर्च्यूअल आयडी स्वीकारला जाईल.यावर अधिक वाचा :

कोहलीला 12 लाख रुपयांचा दंड

national news
बंगळूरच्या मैदानात झालेल्या रोमहर्षक सामन्यात भारतीय संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर धोनी ...

अनमोल अंबानी आरएनएएम आणि आरएचएफचा संचालक

national news
अनिल अंबानी यांचा मुलगा अनमोल अंबानीसुद्धा आता उद्योगजगतामध्ये नव्या जबाबदाऱ्या स्वीकारत ...

इंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश

national news
सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...

आयआयटी मुंबईची सौरचूल सर्वात अव्वल

national news
आयआयटी पवईत मुंबईतील तरुण शास्त्रज्ञांनी बनवलेली सूर्यप्रकाशावर चालणारी सौरचूल देशात नंबर ...

सोने आणि चांदीच्या किंमती सतत वाढ

national news
गेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमती सतत चढताना दिसत आहेत. अक्षय तृतीयानंतर ...

रेडमी नोट 5 खरेदी करण्याची मोठी संधी

national news
शाओमीचा बजेट स्मार्टफोन रेडमी नोट 5 खरेदी करण्याची आज चांगली संधी आहे. हा स्मार्टफोन ...

नोकरीच्या शोधासाठी गुगलची खास सेवा

national news
नोकरीच्या शोधात असणा-यांसाठी गुगलने एक खास सेवा सुरू केली आहे. गुगल फॉर जॉब्स असं या ...

स्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन

national news
जर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...

व्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर

national news
यापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...

फेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार

national news
फेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...