बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 जानेवारी 2018 (16:10 IST)

माझ्या व्यंगचित्रातून तडाखे बसणारच -राज ठाकरे

गेल्या 20 दिवसात बरंच काही घडलं आहे. माझ्या व्यंगचित्रांचा बॅकलॉग (अनुशेष) वाढला आहे. पण मी अनुशेष ठेवणा-यातला मी नाही. लवकरच तो बॅकलॉग भरून काढणार आहे. माझ्या तडाख्यातून सुटलो असे कोणाला वाटत असेल तर चूक,व्यंगचित्रातून तडाखे बसणारच अशा इशारा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे.

राज ठाकरे यांनी आमुलाचा साखरपुडा झाल्यापासून फारसे सक्रिय नव्हते. याआधी काही महिन्यांपासून ते सतत राज्यातील-देशातील राजकीय घडामोडीवर सोशल मिडियाद्वारे भाष्य करत होते. मात्र,डिसेंबर महिन्यात त्यांनी थोडा ब्रेक घेतला होता.

याबाबत राज ठाकरे म्हणतात की,आता अधिक काही बोलत नाही.लवकरच व्यंगचित्रांची मालिका पुन्हा सुरु होईल.तुम्हाला आवडेल नक्की.ज्यांना त्रास व्हायचाय त्यांना होईल. बाकी सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा,असे राज ठाकरेंनी फेसबुकवर संदेश पाठवत सत्ताधा-यांना इशारा दिला आहे.