testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सरकार एअर इंडियामधील आपले समभाग विकणार

मोठ्या कर्ज असलेल्या
एअर इंडियामधील आपले समभाग विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्र सरकारच्या कॅबिनेटच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता एअर इंडियाचे खाजगीकरण होणे आत निश्चित झाले आहे. सरकारी अधिपत्याखालील एअर इंडिया ही देशातील सर्वात मोठी विमान कंपनी आहे. विमान वाहतूक बाजारात तिचा वाटा 17 टक्के एवढा असून, अंतर्गत प्रवासी वाहतुकीतही एअर इंडियाकडे 14.6 टक्के एवढा वाटा आहे.

एअर इंडियाच्या खाजगीकरणाविषयी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली म्हणाले, "समभागविक्रीच्या माध्यमातून नेहमीच भविष्यातील शक्यता तपासल्या जात असतात. एअर इंडियाच्या बाबतीत आम्ही याच दिशेने पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. काही संस्थांना खाजगीकरणाकडे वळवण्यात येऊ शकते. अशा संस्था आम्ही निश्चित केल्या आहेत."
असे त्यांनी सांगितले.


यावर अधिक वाचा :