गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 15 मे 2017 (11:55 IST)

एटीएमला रॅनसमवेअरचा धोका, सिस्टम अपडेटसाठी २ ते ३ तास एटीएम बंद

रॅनसमवेअर व्हायरसच्या भीतीमुळे रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना एटीएमच्या सुरेक्षासाठी सिस्टम अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेला यासंबंधीत आदेश दिले होते. एटीएम सिस्टम अपडेट करण्यासाठी दिवसातील दोन ते तीन तास एटीएम बंद राहू शकतात. दरम्यान एटीएम तीन ते चार दिवस बंद राहणार, अशीही चर्चा सध्या सुरु आहे.एटीएम मशीन्सला व्हायरसपासून धोका असल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना त्यांच्या ATM सिस्टीम अपडेट करण्याचे निर्देश दिले आहेत. या  सायबर हल्ल्याचा 150 देशातील 2 लाख संगणकांना फटका बसला आहे.  देशातील 2.25 लाख एटीएमपैकी 60 टक्क्याहून अधिक एटीएममध्ये आऊटडेटेड विंडोज एक्सपी सिस्टीम आहे. या सिस्टीमचे नियंत्रण त्या विक्रेत्यांकडे असते जे बँकेला ही सिस्टीम पुरवितात. एटीएममध्ये तात्काळ अपडेट करा, तो पर्यंत एटीएममशीन्स वापरु नका असे निर्देश आरबीआयने बँकांना दिले आहेत.