testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

लवकरच सर्वच एटीएममध्ये मिळणार 200 च्या नोटा

रिझर्व्ह बँक 200 रुपयांच्या नोटांच्या वितरणात वाढ करणार आहे. त्यासाठी सर्व एटीएममध्ये बदल करण्यात यावेत, असे आदेश बँकांना दिले आहेत. त्यामुळे काही दिवसांत सगळ्याच बँकांच्या एटीएममधून 200 च्या नोटा मिळतील.
रिझर्व्ह बँकेने 200 रुपयांच्या नोटांचे वितरण वाढवल्याने बँकांनी एटीएममध्ये बदल करावेत, असे आदेश दिले आहेत. या आदेशाच्या अंमलबजावणीवर बँकिंग क्षेत्राला 1000 कोटी रुपये खर्च करावा लागू शकतो. 200 रुपयांच्या नोटांच्या वितरणासाठी बँका आणि एटीएमची निर्मिती करणार्‍या कंपन्यांनी लवकरात लवकर एटीएममध्ये बदल करावेत, असे आदेश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत.


यावर अधिक वाचा :