शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

शनिवार रविवार बँका व्यवहार सुरूच राहणार- केंद्र सरकार

नोटा बंद केल्यावर नागरिकांना सुविधा व्हावी यासाठीबँका गुरुवारी एक तास अगोदर सुरु होणार असून शनिवार (12 नोव्हेंबर) आणि रविवार (13 नोव्हेंबर) रोजीही सर्व बँका सुरु राहणार आहेत.   देशभरात 10 नोव्हेंबर रोजी बहुतांश एटीएम मशिन्स बंद रहाणार आहेत. तर दुसरीकडे  मात्र सर्वसामान्य नागरिकांसाठी बँकांचे व्यवहार सुरु राहतील. विशेष म्हणजे सर्व  नोटा बदलण्यासाठी रिझर्व्ह बँकेतर्फे हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
 
रुग्णांच्या सुवेधे साठी 11 नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर औषध खरेदीसाठी पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत. तर  काही महत्त्वाच्या ठिकाणी (रुग्णालयं, पेट्रोल पंप, सीएनजी पंप, रेल्वे आणि बस तिकीट काऊंटर, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमानतळं, स्मशान इत्यादी) 11 तारखेपर्यंत पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांनी व्यवहार करण्याची मुदत देण्यात आली आहे.