बँक ऑफ महाराष्ट्रला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ठोठावला 1.12 कोटींचा दंड, कारण...
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं बँक ऑफ महाराष्ट्रला 1.12 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) काही नियमांचं पालन न केल्याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रला दोषी ठरवण्यात आलं आहे.
याशिवाय राजकोटच्या नागरिक सहकारी बँकेवर 12 लाख रुपये आणि हरियाणाच्या स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेला 25 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
महाराष्ट्र बँकेवर केवायसी संदर्भातल्या काही नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
रिस्क मॅनेजमेंटशी संबंधित नियमांना गांभीर्यानं न घेणं आणि बँकिगच्या वित्तीय आऊटसोर्सिंग नियमांना बगल दिल्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्रला हा दंड ठोठावण्यात आल्याचं आरबीआयनं म्हटलं आहे.
बँकिग नियमनाशी संबंधित नियमांचं पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात येत असल्याचं आरबीआयनं जाहीर केलं आहे.
या कारवाईचा बँकेचा तिच्या ग्राहकांसोबत होणाऱ्या देवाण-घेवाणीशी काहीएक संबंध नसल्याचंही आरबीआयनं स्पष्ट केलं आहे.