शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

देशभरात बँकांचा एकदिवसीय संप

विविध मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या (यूएफबीयू) नेतृत्वाखालील संघटनांनी आज संपूर्ण देशभरात बँकांचा एकदिवसीय संप पुकारला आहे. २१ फेब्रुवारी रोजी झालेली चर्चा अयशस्वी ठरल्यामुळे संपावर जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे ऑल इंडिया बँक एम्पलॉइज असोसिएशनचे (एआयबीईए) महासचिव सी. एच. वेंकटचलम यांनी सांगितले होते.

सरकारच्या बँक सुधारणा धोरणाविरोधात आणि नोटाबंदीच्या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या अतिरिक्त कामाचा मोबदला मिळावा, म्हणून हा संप पुकारण्यात आला असून यामुळे देशभरातील जवळपास 1 लाख 25 हजार बँक शाखा आज बंद आहे.खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एक्सिस बँक व कोटक महिंद्रा बँकेत मात्र कामकाज सुरू राहणार असून त्यांनी संपात सहभाग घेतलेला नाही. या बँकांमध्ये फक्त चेक क्लिअरन्सचे काम होणार नाही. यूएफबीयूअंतर्गत नऊ संघटना आहेत. भारतीय मजदूर संघाशी संबंधित नॅशनल ऑर्गनायजेशन ऑफ बँक वर्कर्स व नॅशनल ऑर्गनायजेशन ऑफ बँक ऑफिसर्स या संघटना संपात सहभागी होणार नाहीत.