मोठी बातमी ! मद्य प्रेमींसाठी आनंदाची बातमी, राज्यात विदेशी दारू झाली स्वस्त
राज्यातील मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. मद्यावरील विशेष शुल्काबाबत राज्यातील ठाकरे सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. परदेशातून आयात करण्यात येणाऱ्या मद्यावरील विशेष शुल्काचा दर राज्य सरकारने कमी केला आहे. हे दर 18 नोव्हेंबरपासून 300 टक्क्यांवरुन 150 टक्के करण्यात आला होता. त्यामुळे आता दारुच्या निर्मिती शुल्काचा विचार करुन विदेशी दारुचे नवीन दर उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केले आहेत.सध्या आठ प्रकारचे दारूचे दर जाहीर करण्यात आले आहे.
राज्य सरकारच्या विशेष शुल्क कमी करण्याच्या निर्णयामुळे विदेशातून आयात करण्याच्या दारूचे दर इतर राज्याच्या दारूच्या दराच्या बरोबरीने आल्यामुळे दारूची तस्करी करणाऱ्यांवर आळा बसेल. त्यामुळे दारूची चोरी होण्याचे प्रमाण कमी होतील. असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही लोक इतर राज्यातून दारूचे ने आण करतात आणि विकतात. असे कोणी केले तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
.