1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 21 ऑक्टोबर 2021 (21:53 IST)

मोठी बातमी ! कांदा व्यापाऱ्यांवर आयकरचे छापे; शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

Big news
कांद्याचा दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या आयकर विभागाच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीतील 6 कांदा व्यापाऱ्यांच्या 13 ठिकाणी अचानक छापे टाकण्यात आले.
 
त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. या कारवाही मुळे कांदा व्यापारी हैराण झाले आहेत. दरम्यान गेल्या आठवड्याच्या तुलनेत गुरुवारी कांद्याचे भाव प्रति क्विंटल एक हजार रुपयांनी कमी झाले. कांद्याचे बाजारभाव पंचवीसशे रुपयांपर्यंत खाली आल्या नंतर ही कारवाही करण्यात आली आहे. दरम्यान राज्यात अतिवृष्टी, मुसळधार पावसामुळे शेतात लागवड केलेल्या कांद्याची रोपे खराब झाली आहेत.
 
बदलत्या हवामानाचा फटका हा चाळीत साठवलेल्या उन्हाळ कांद्याला ही बसल्याने मोठ्या प्रमाणात कांद्याचे नुकसान झाले आहे. दरम्यान देशांतर्गत मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण झाल्यामुळे देशांतर्गत कांद्याच्या बाजारभावात मोठी वाढ झाल्याचे चित्र निर्माण झाले होते.ही भाववाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या आयकर विभागाच्या वतीने पिंपळगाव बसवंत येथील सहा कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांचे गोदाम, ऑफिस आणि घरी अशा 13 ठिकाणी छापे टाकले.
त्याचा थेट परिणाम नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह इतर बाजार समित्यांमध्ये आज दिसून आला. त्यामुळे बुधवारच्या तुलनेत आज गुरुवारी कांद्याच्या सर्वसाधारण दरात दोनशे रुपयाची घसरण होत.कांद्याचे बाजार भाव 2500 रुपयांच्या खाली गेले. आता ऐन दिवाळीच्या तोंडावर कांद्याच्या बाजारभावात घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.