शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 मे 2019 (09:37 IST)

सचिन ने लाँच केलेल्या नवीन बीएमडब्ल्यू एक्स 5 किंमत माहित आहे का ?

आपल्या देशात परदेशी कार उत्पादक प्रसिद्ध कंपनी  बीएमडब्ल्यू इंडियाने एक्स 5 मॉडल लाँच केले. बीएमडब्ल्यू इंडियाने एक्स 5 चे तीन व्हेरिअंट उपलब्ध केले आहेत. बीएमडब्ल्यूच्या xDrive30d Sport ची किंमत 82.4 लाख रुपये असून, बीएमडब्ल्यू एक्स 5 ला चेन्नई येथे असेंबल करण्यात आले होते. त्यात इतक्या महाग कारचे लाँचींग आपल्या आवडत्या सचिन तेंदुलकरने केले आहे.
 
कारमध्ये पेट्रोल, डिझल दोन्ही पर्याय उपलब्ध केले आहेत. कारमध्ये रिस्टाईल्ड फ्रंट बंपर दिला आहे. यासोबत किडनी डिझाईन ग्रिल्स, नवी हेडलाईट्स, एसईडी डेटाईम रनिंग लाईट्स दिली आहे. रिअरमध्ये एलईडी टेल लाईट्स आणि रिस्टाईल्ड रिअर बंपर दिला आहे.
 
बीएमडब्ल्यू एक्स 5 CLAR प्लॅटफॉर्मवर तयार
 
कारचे डायमेंशन लांबी 36mm, रुंदी 66 mm, आणि उंची 19 mm
 
व्हीलबेस 42 mm वरुन वाढवून 2,975 mm
 
कारमध्ये मोठी स्पेस मिळेल
 
कारमध्ये 645 लीटरचा बूट स्पेस 1,860 लीटर्ससाठी वाढवता येणार
 
इंजिन बीएमडब्ल्यू एक्स 5 मध्ये 3.0 लीटर टर्बो डीझल इंजिन
 
 261 bhp पावर आणि 620 Nm चा टॉर्क जनरेट करते
 
 कारमध्ये 8 ऑटोमेटिक गिअर
 
 फक्त 6.5 सेकंदात ही कार 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेग
 
xDrive30d Sport : 72.9 लाख
 
xDrive30d xLine आणि xDrive40i M Sport : 82.4 लाख