रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 18 ऑक्टोबर 2018 (07:20 IST)

बीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर

BSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी १० दिवसांची असल्याचेही कंपनीने सांगितले आहे. म्हणजेच कंपनीकडून एकूण २० जीबी डेटा दिला जाणार आहे. हा प्लॅन १५ ऑक्टोबरपासून लागू करण्यात आला असून देशभरातील ग्राहकांना ३ जी सुविधेअंतर्गत याचा लाभ घेता येणार आहे. विशेष म्हणजे रोमिंगमध्येही अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे.