1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 15 ऑक्टोबर 2018 (16:54 IST)

पोस्टातून मिळणार आता एलईडी बल्ब, ट्यूब

पोस्ट ऑफिसमध्ये आता नागरिकांना एलईडी बल्ब, एलईडी ट्यूब मिळणार आहेत. ऊर्जा कार्यक्षमता सेवा लिमिटेड या कंपनीने उजाला योजनेंतर्गत पोस्ट ऑफिसबरोबर एका करारावर स्वाक्षरी केली आहे. या योजनेंतर्गत तुम्हाला पोस्टात स्वस्त किमतीत एलईडी बल्ब, एलईडी ट्यूब उपलब्ध करून दिले आहेत. 
 
कंपनीच्या माहितीनुसार, उन्नत ज्योती बाय अफर्डेबल एलईडी फॉर ऑल अंतर्गत विजेचे बिल कमी येईल, अशी उपकरणे वितरीत करण्याचा पोस्ट ऑफिसबरोबर करार झाला आहे. इइएसएल ही कंपनी देशभरातील पोस्टाच्या सर्व ऑफिसांमध्ये एलईडी बल्ब, एलईडी ट्यूब आणि बीईई 5-स्टार (की वीज वापरणारे) पंख्यांचे वितरण करणार आहे.
 
कमी वीज वापरणारी ही उपकरणे सुरुवातीला विविध राज्यांतील काही ठरावीक पोस्ट ऑङ्खिसध्ये ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर ती पोस्टाच्या इतरही ऑङ्खिसांध्ये वितरीत करण्यात येणार आहेत.
 
उजाला योजनेंतर्गत देशभरात 31 कोटी एलईडी बल्ब, 66 लाख एलईडी ट्यूब लाइट आणि की वीज वापरणारे जवळपास 20 लाख पंखे वितरीत करण्यात आले आहेत.
 
कंपनीच्या माहितीनुसार, या उपकरणामुंळे 4,000 कोटी किलोवॉट उर्जेची बचत होणार आहे.