शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

बाप्परे, बाळाने चुकून एलईडी बल्ब गिळला

चिपळूणमध्ये राहणाऱ्या ७ महिन्याच्या अरिबाने खेळता खेळता चुकून एलईडी बल्ब गिळला. पालकांना वाटले की तिने, दोरा किंवा मोबाईलची पिन गळली असावी. त्यानंतर तिला सतत खोकला आणि ताप येऊ लागला.  आठवड्याभराने त्यांनी अरिबाला बाई जेरबाई वाडिया बालरुग्णालयात दाखल केले असता डाँक्टरांनी  ब्लाँन्कोस्कोपीने अगदी २ मिनिटांत हा बल्ब बाहेर काढला. 
 
बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटलमधील ईएनटी (कान-नाक-खसा) विभागाचे प्रमुख डॉ. दिव्या प्रभावत म्हणतात, "प्रतिजैविके देण्यात आली आणि जेव्हा ब्रॉन्कोस्कोपी केली गेली तेव्हा तो बाह्यघटक बरेच दिवस तिथे राहिल्याने संपूर्ण फुफ्फुसामध्ये कणिका उती (उतीचे कण) आढळून आली. हा संसर्ग काढून घालवून टाकण्यासाठी इंट्राव्हेनस (थेट नसेमधून) प्रतिजैविके आणि स्टेरॉइड्स देण्यात आली.  त्यानंतर पुन्हा एकदा ब्रॉन्कोस्कोपी केली आणि दोन मिनिटांत हा बाह्यघटक (स्कोपमधून केवळ एक वायर दिसत होती) फोरसेप्सचा वापर करून काढण्यात आला. आश्चर्य म्हणजे तो २ सेंटिमीटरचा एलईडी बल्ब होता.