शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 जानेवारी 2018 (09:20 IST)

अंबाबाई मंदिर परिसर पूर्ण प्लास्टिकमुक्त

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर पूर्ण प्लास्टिकमुक्त झाला आहे. त्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने त्याच्या अखत्यारित येणारी साडेतीन हजारांपेक्षा अधिक मंदिर प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी प्लास्टिक बंदीला चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यांनी भाविकांसाठी कापडी पिशव्या उपलब्ध करुन पाठिंबा दिला आहे.

अंबाबाई देवीचं मंदिर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने पुढाकार घेतला. यातून  सहा महिन्यात मंदिर परिसर प्लास्टिकमुक्त झाला. देवळात येणारे भाविक देवीच्या पुजेचं साहित्य घेताना प्लास्टिक पिशव्यांची मागणी करतात, त्यांना आता कापडी पिशव्या देण्यास मंदिरातील दुकानदारांनी सुरुवात केली आहे.