Widgets Magazine
Widgets Magazine

भारतीय ऑटो बाजारात चीनी कारचे पदार्पण

मुंबई, बुधवार, 19 जुलै 2017 (12:45 IST)

china car

जगातील मोठ्या वाहन बाजाराच्या दिशेने भारताची होत असलेली वाटचाल अनेक परदेशी कंपन्यांना भारतात व्यवसाय वाढीची संधी देत आहे. याचाच फायदा घेऊन भारतीय बाजारात प्रवेशासाठी चीन उत्सुक असून चीनी एसएआयसी मोटर कार्पोरेशन भारतात त्यांची पावले रोवण्यासाठी सिद्ध झाले आहे. कंपनीचा ब्रिटीश ब्रॅंड एमजी त्यांची कांही मॉडेल्स भारतात लॉंच करण्याच्या तयारीत आहे. भारतातील जनरल मोटर्सच्या बंद पडलेल्या हलोल प्रकल्पात या कारचे उत्पादन करण्याची तयारी कंपनीने केली असल्याचे समजते.
 
एसएमआयसी मोटर कार्पोरेशन त्यांच्या एमजी आठ, एमजी जीएस, एमजी एक्‍सएस व एमजी 6 ही मॉडेल्स भारतीय बाजारात आणणार आहे. पैकी एमजी 8 ही बी प्लस सेगमेंटमधील हचबॅक कार आहे व ती भारतात मारूती बलेनो, हयुंडाई एलिट आय टेन, होंडा जॅझ यांच्याबरोबर स्पर्धा करेल. एमजी जीएस ही एसयूव्ही असून जगभरात ती लोकप्रिय आहे. एमजी एक्‍सएस सध्याच आंतरराष्ट्रीय बाजारात शोकेस केली गेली आहे व ती कॉम्पॅक्‍ट एसयूव्ही आहे. ती इको स्पोर्ट, विटारा ब्रेझा, ह्युंडाई क्रेटाशी स्पर्धा करेल.एमजी सिक्‍स ही कंपनीची एकुलती सेदान असून इंटिरियर स्पेस भरपूर असलेली ही कार 0 ते 100 किमीचा वेग 8.4 सेकंदात घेते.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

अर्थजगत

news

आधारकार्ड अभ्यासासाठी 9 सदस्यांचे घटनापीठ

आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक करणं हे व्यक्तिगत स्वातंत्र्याचं उल्लंघन आहे का हे जाणून ...

news

प्रधानमंत्री पीक विमा योजनेला मुदतवाढ

खरीप हंगामात राज्यातील सर्व जिल्हयांत प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय ...

news

किरकोळ किंमतीवरील महागाई नियंत्रणात

महागाई रोखण्यात सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेला आता चांगलेच यश आले आहे. मात्र औद्योगिक ...

news

वॉलमार्ट इंडियाची 900 कोटीची गुंतवणूक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य शासनाच्या उद्योग विभाग आणि वॉलमार्ट ...

Widgets Magazine