मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 7 नोव्हेंबर 2019 (09:38 IST)

नागरिकांनो तुम्हीच सांगा कसे कांद्याचे भाव कमी करायचे ते

आता अवकाळी पाऊस झाला त्यामुळे साठवलेला कांदा खराब झाला आहे. त्यातच नवीन कांदा यायला अनेक महिने आहेत, त्यामुळे बाजारातील मागणी आणि होणारा पुरवठयामुळे आता तर कांद्याचे भाव गगनाला भिडणार आहेत. त्यामुळे राज्य काय केंद्र सरकारने सुद्धा प्रयत्न सुरु केले की भाव कमी कसे होतील. पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने देशातील बाजारांमध्ये कांद्याचे भाव भडकले आहेत. किरकोळ बाजारात कांद्याचे भाव शंभरीच्या पुढे गेले आहेत. कांद्याच्या वाढत्या भावांनी केंद्र सरकारच्या चिंतेतही वाढ झाली असून,  आयात केलेला कांदा बाजारात आल्यावर कांद्याचे दर कमी होतील, तसेच कांद्याचे भाव कमी करण्यासाठी काय उपाय योजता येतील, याचा सल्ला सर्वसामान्य नागरिकांनीही सोशल मीडिया किंवा कंझ्युमर अॅपच्या माध्यमातून द्यावा, असे आवाहन केंद्रीय अन्न आणि नागरीपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी केले आहे. 
 
कांद्याच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी सचिवांसोबत महत्वाची बैठक घेतली होती.   कांद्याचे भाव कमी करण्यासाठी काय उपाय योजता येतील, याबाबत पासवान यांनी सर्वसामान्यांकडूनही सल्ला मागवला आहे.