सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 28 जुलै 2020 (09:04 IST)

केंद्राकडून जीएसटी परतावा जाहीर, मिळाले १९ हजार कोटी

केंद्र सरकारचा महाराष्ट्राला जीएसटी परतावा जाहीर करण्यात आलायं. जीएसटी परताव्याचे महाराष्ट्राला १९ हजार २३३ कोटी रूपये देण्यात येत आहेत. २०१९-२० चा हा जीएसटी परतावा देण्यात आलाय.
 
देशात सर्वधिक मदत महाराष्ट्राला मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. एकूण १ लाख ६५ हजार कोटींचा परतावा देण्यात आलाय. केंद्राकडून आलेल्या परिपत्रकात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन कोरोना संदर्भात सुरु असलेल्या उपाययोजनांसंदर्भात माहिती दिलीय. यामध्ये महाराष्ट्र, युपी आणि बंगालमध्ये टेस्टिंग क्षमता १० हजारांनी वाढवत असल्याचे ते म्हणाले.