हे महत्त्वाचे काम 31 मार्चपर्यंत पूर्ण करा
हे आर्थिक वर्ष संपायला काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत, आपण करदाते असाल तर आपल्या साठी एक मोठे अपडेट आहे. अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 आहे.
जर करदात्यांनी निर्धारित मुदतीत ही कामे मार्गी लावली नाहीत, तर पुढील आर्थिक वर्षात त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आपल्याला भुर्दंड लागू शकतो. चला जाणून घेऊया कोणते आहे ते महत्त्वाचे काम
1- आधार-पॅन कार्ड लिंक- आधार कार्डसोबत पॅन कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 आहे. जर आपण ही दोन महत्त्वाची कार्डे लिंक केली नाहीत तर आपले पॅन कार्ड निष्क्रिय होईल आणि आपल्याला 10000 हजार रुपयांचा दंडही होऊ शकतो.
2- उशीरा आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख - उशीरा आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 आहे. या काळात आपण ITR दंडासह दाखल करू शकता. यानंतर आपण हे काम करू शकणार नाही.
3- ITR चे ई-व्हेरिफिकेशन- करदात्यांना त्यांच्या ITR मधील चुका सुधारण्यासाठी 31 मार्च 2022 पर्यंत वेळ आहे. त्यानंतर ही संधी मिळणार नाही.
4- टॅक्स सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक -: जर आपल्याला टॅक्स सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्वरा करा.31 मार्चनंतर आपण हे काम करू शकणार नाही.