शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

गायीच्या दुधाचे दर वाढले, प्रति लीटर दूध ४४ रुपये

गायीच्या दूध विक्री दरात दोन रुपयांची वाढ होऊन  ४२ रुपये प्रति लीटर दूध आता ४४ रुपयांवर गेले आहे. ८ जूनपासून ही भाववाढ लागू होणार आहे. अमूलच्या दुधाच्या दरात झालेल्या वाढीनंतर आता अन्य दूध उत्पादकांनीही दरवाढीचा निर्णय घेतला आहे. पुण्यात खासगी सहकारी दूध उत्पादकांच्या बैठकीत दूधदरवाढीचा निर्णय घेण्यात आला.
 
गायीच्या दूध विक्री दरात वाढ झाली आहे. ८ जूनपासून गायीचं दूध प्रति लीटर दोन रुपयांनी वाढ होणार आहे. गायीचे दूध प्रति लीटर ४२ रुपयांवरून ४४ रुपये होणार आहे. खासगी आणि सहकारी दूध संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. ६४ खासगी आणि सहकारी दूध संघांचे प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित होते. ज्या दूध संघांचे दर ४४ रुपये आहेत ते दरवाढ करणार नाहीत. गोकुळ, वारणा, अमुल, मदर डेअरी यांनी एक जूनपासूनच दरवाढ केली आहे.