शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 मे 2019 (09:38 IST)

आरटीजीएस करणे झाले सोपे, वेळेत झाला मोठा बदल

रिझर्व बॅंक ऑफ इंडीया (RBI) ने आरटीजीएस (रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट)चा वेळ वाढवून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत केला आहे. आतापर्यंत 4.30 वाजेपर्यंतच आरटीजीएस व्यवहार केला जायचा. सकाळी 8 वाजल्यापासून आरटीजीएसला सुरुवात होणार आहे. वेगवेगळ्या वेळात आरटीजीएसच्या माध्यमातून रक्कम हस्तांतरित करण्यावर वेगवेगळे शुल्क आकारण्यात येणार आहे. वेळेप्रमाणे शुल्क देखील बदलणार आहे. आरबीआयच्या वेबसाईटवर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. 
 
आरटीजीएस व्यवहार सकाळी 8 वाजता खुला होणार असून ग्राहकांसाठी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तर बॅंक अंतर्गत व्यवहारासाठी संध्याकाळी 7.45 आणि आयडीएल रिवर्सलसाठी संध्याकाळी 7.45 ते 8 वाजेपर्यंत वेळ असणार आहे. वेगवेगळ्या वेळात आरटीजीएसच्या माध्यमातून व्यवहार केल्यास वेगवेगळे शुल्क भरावे लागेल. सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंतच्या व्यवहारावर कोणते शुल्क लागणार नाही. सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत च्या व्यवहारावर 2 रुपये, दुपारी 1 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच्या व्यवहारावर 5 रुपये आणि 6 वाजल्यानंतरच्या आरटीजीएस व्यवहारावर 10 रुपये शुल्क लागणार आहे. आतापर्यंत आरटीजीएसने 2 ते 5 लाखापर्यंतच्या व्यवहारास 25 रुपये आणि 5 लाखाहुन अधिक रक्कमेवर 55 रुपये शुल्क लागते. आरटीजीएसच्या माध्यमातून रक्कम हस्तांतरीत करण्यावर कोणतीही सीमा नाही. आरटीजीएसअंतर्गत ही सुविधा 1 जूनपासून लागू होणार आहे.