शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

गेल्या दोन महिन्यांमध्ये डिजिटल व्यवहार कमी झाले

देशात डिजिटलाजेशनचे वारे वाहात असतांना प्रत्यक्षात डिजिटल व्यवहारांचे प्रमाण कमी झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने डिजिटल व्यवहारांसदर्भात नवी आकडेवारी जाहीर केली आहे.

गेल्यावर्षी डिसेंबरच्या तुलनेत यंदा जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांमध्ये डिजिटल व्यवहार कमी झाल्याचे या आकडेवारीवरुन स्पष्ट होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ९५. ७ कोटी डिजिटल व्यवहार झाले होते. जानेवारीमध्ये हे प्रमाण घसरुन ८७ कोटींवर आले. तर फेब्रुवारीमध्ये डिजिटल व्यवहारांचे प्रमाण ६४. ८ कोटींवर घसरले.