शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 17 जानेवारी 2018 (09:04 IST)

12.36 टक्‍क्‍यांनी निर्यात वाढली

वार्षिक पातळीवर डिसेंबर महिन्यात निर्यात 12.36 टक्‍क्‍यांनी वाढून 27.03 अब्ज डॉलर झाली आहे. या महिन्यात अभियांत्रिकी आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीत वाढ झाली आहे. असे असले तरी आयातीतही 21.12 टक्‍क्‍यांची वाढ होऊन ती 41.91 अब्ज डॉलरची झाली असल्यामुळे परकीय व्यापारातील तुट 41 टक्‍क्‍यांनी वाढून 14.88 अब्ज डॉलर झाली आहे. ऑगस्ट महिन्यापासून कमी अधिक प्रमाणात निर्यात वाढू लागली आहे.
 
तरीही तयार कपड्याच्या निर्यातीत पुरेशी वाढ झालेली नाही. डिसेंबर महिन्यात सोन्याच्या आयातीत 71.5 टक्‍क्‍यांनी वाढ होऊन या महिन्यात 3.39 अब्ज डॉलरचे सोने आयात करण्यात आले. हा सरकारच्या दृष्टिकोनातून चिंतेचा विषय आहे. पेट्रोलियम पदार्थाची आयातही 35 टक्‍क्‍यांनी वाढून 10.34 अब्ज डॉलरची झाली आहे.