रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 23 ऑगस्ट 2018 (17:02 IST)

फ्लिपकार्टची 'टू गूड' वेबसाइट लाँच

ऑनलाइन रिटेल कंपनी फ्लिपकार्ट आता जुन्या सामानाला नवं करून विकणार आहे. यासाठी त्यांनी एक वेबसाइट लाँच केली आहे. ज्याचं नाव आहे 'टू गूड' (2GUD) सुरूवातीला या वेबसाइटवर जुनं इलेक्ट्रिक सामान विकलं जाणार आहे. ज्यासोबत कंपनी गुणवत्तेचं सर्टिफिकेट देखील देणार आहे. यातील वस्तू या कमी दरात दिल्या जाणार आहेत.
 
या स्टोरमध्ये आता जुने मोबाइल फोन, लॅपटॉप, स्मार्ट वॉच आणि टॅबलेट सारख्या गोष्टी उपलब्ध आहेत. कंपनीने सांगितलं आहे की, येणाऱ्या काही दिवसांत फ्लिपकार्टच्या या नव्या स्टोरमध्ये स्पीकर, पावर बँक, हेअर ड्रायर, हेअर स्ट्रेटनर, टीव्ही सेट आणि त्यासारखे 400 हून अधिक प्रोडक्ट उपलब्ध होणार आहे.