testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

घोळच घोळ : एकच आधारवर बँक खाते क्रमांक असलेले शेकडो लाभार्थी

Last Modified बुधवार, 25 ऑक्टोबर 2017 (11:46 IST)

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेतील सावळागोंधळ आता समोर येत आहे. एकच आधार क्रमांक आणि बँक खाते क्रमांक असलेले शेकडो लाभार्थी असल्याचे उघड झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी यासंदर्भात बैठक घेणार आहेत. राज्यातील बँक प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीस सुरुवात केली असून पहिल्या टप्प्यात ८ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे. मात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या यादीतील सावळागोंधळ आता समोर येत आहे. एकच आधार कार्ड क्रमांक आणि बँक खाते क्रमांक असलेले लाखो लाभार्थी या यादीत दिसत आहे. उदाहरणार्थ, दिलीप काचळे या शेतकऱ्याचे आधार क्रमांक ११११११११०१५७ आणि बँक खाते क्रमांक १११११११११११ आहे. तर बाळकृष्ण रामघंगाळी यांचे आधार कार्ड क्रमांक ११११११११०१५७ आणि बँक खाते क्रमांकही १११११११११११ आहे. अशा शेकडो लाभार्थ्यांचे आधार आणि बँक खाते क्रमांक एकच असून यामुळे राज्य सरकारसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव व्ही के गौतम म्हणाले, आम्हाला एकच आधार आणि बँक खाते क्रमांक असलेले लाभार्थी बघून धक्काच बसला. शेकडो लाभार्थ्यांचा आधार क्रमांक आणि बँक खाते क्रमांक

एकच कसा असू शकतो. याशिवाय एकाच शेतकऱ्याच्या नावाने सहा कर्ज खाते आणि एका शेतकऱ्याचे नाव एकाच यादीत तीन वेळा झळकल्याचे समोर आले आहे.यावर अधिक वाचा :

भाजपच्या सरकारला स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याचा विसर

national news
ज्या भाजपला स्व. गोपीनाथ मुंडे यांनी सामान्य लोकांपर्यंत नेण्याचे काम केले, त्याच भाजप व ...

देशातील अनेक विद्यापीठे झाली स्वायत्त, पुणे विद्यापीठ

national news
देशभरातल्या दर्जेदार असलेल्या एकूण 62 विद्यापीठ, शिक्षण संस्थांना स्वायत्त दर्जा दिला ...

पार्सल स्फोट : काश्मिरी समाजसेवक नहार यांना मारण्याचा ...

national news
अहमदनगर येथे कुरिअर पार्सलमध्ये स्फोट झाला आहे. या प्रकरणात स्फोटाप्रकरणी आता धक्कादायक ...

...तर राज्यात मराठी+मराठा समीकरण

national news
मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्यादिवशी शिवतीर्थावर झालेल्या झंझावाती सभेचे सध्या ...

प्रदूषण मुक्ती साठी जाळणार तब्बल ५० हजार किलो लाकडे

national news
चांगले करतांना लोक कसे वेड्या सारखे वागतात याचा पुन्हा प्रत्येय येतो आहे. असाच काहीसा ...

जिओकडून स्वस्त दरात JioFi 4G LTE हॉटस्पॉट डिव्हाईस लॉन्च

national news
रिलायन्स जिओने स्वस्त दरात अजून एक नवे प्रॉडक्ट स्वस्त दरात युजर्ससाठी उपलब्ध केले ...

अस्सल मराठमोळ्या गाण्यांवर आधारित व्हिडिओ व्हायरल

national news
यूट्यूबवर मराठी वेब सिरीयस फार कमी आणि मराठी कन्टेन्ट पण काहीसा दिसत नाही. पण अस्सल ...

व्हॉट्सअॅपवर आता ग्रुप डिस्क्रिप्शन देता येणार

national news
व्हॉट्सअॅपने नवं फिचर लॉन्च केलं आहे. नव्या फिचरमुळे आता ग्रुप डिस्क्रिप्शन देता येणार ...

असे डाउनलोड करा ई-आधार

national news
भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड अनिवार्य झाले असून अनेक सेवा आणि योजनांसाठी सरकारने आधार ...

एसबीआय क्विक अॅप सुरु

national news
स्टेट बँक ऑफ इंडियाने एसबीआय क्विक अॅप सुरु केले आहे. या अॅपमध्ये खास एटीएम कार्डच्या ...