गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

एक रूपयाची नोट आली, पण गेली कुठे?

नाशिक: एक रूपयाच्या नोटांची छपाई नोटबंदी काळात पुन्हा सुरू झाली. त्यानंतर गेल्या वर्षभरात पुन्हा छपाई करण्यात आली. आताही ती सुरू आहे. मात्र, सामन्य नागरिकांना या नोटांचे दर्शन दुर्लभ झाले आहे. एक रूपयाच्या कोट्यवधींच्या संख्येने छापलेल्या नोटा जातात कुठे हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
 
नाशिकरोड करन्सी प्रेसमध्ये एक रूपयाच्या नोटांची छपाई पुन्हा सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे एक रूपयांच्या कोट्यवधी नोटा छापूनही सामान्यांना त्यांचे दर्शन दुर्लभ झाले आहे. नाशिकरोड करन्सी प्रेसमध्ये दहा, वीस, पन्नास, शंभर, पाचशे व हजाराच्या नोटांची छपाई होते. सरकारच्या धोरणामुळे एक रूपयाच्या नोटांची छपाई पंचवीस वर्षापूर्वी बंद होऊन नाण्यांचे उत्पादन सुरू झाले.