सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 13 जानेवारी 2021 (16:17 IST)

इंधन दरवाढ, मुंबईत पेट्रोलच्या दराने ९१ रुपयांचा टप्पा ओलांडला

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे देशात पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ सुरूच आहे.त्यामुळे आज मुंबईत पेट्रोलच्या दराने ९१ रुपयांचा टप्पा ओलांडला असून, ९१.०७ रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोलची विक्री होत आहे. तर, डिझेलचे दर देखील विक्रमी पातळीवर पोहचले असून ८१.३४ रुपये प्रतिलिटर दर आहे. या अगोदर ४ ऑक्टोबर २०१८ रोजी, मुंबईत पेट्रोलचा दर ९१.३४ रुपये प्रतिलिटर होता.
 
राज्यातील परभणी येथे पेट्रोलचा दर सर्वाधिक ९३.४५ रुपये प्रतिलिटर व डिझेल ८२.४० रुपये प्रतिलिटर पर्यंत पोहचला आहे. या अगोदर ६ व ७ जानेवारी रोजी पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाली होती. दिल्लीसह देशातील अनेक प्रमुख शहारांमध्ये देखील पेट्रोल,डिझेलच्या दरात मोठी वाढ झालेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ सुरूच आहे.