शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 24 डिसेंबर 2022 (16:22 IST)

Gold Price : सोन्याच्या दरात घसरण जाणून घ्या दर

gold
शुक्रवार, 23 डिसेंबर, या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा भाव 54,284 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. तर, गेल्या आठवड्यात भाव 53,885 रुपयांवर बंद झाले होते. या आठवड्यात सोन्याचा भाव 54,763 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. यानंतर घट नोंदवण्यात आली. सोने- चांदी भाव आज सोन्या-चांदीच्या दरात घट झाली.सोन्याचा भाव अजूनही 54 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वरच आहे.चांदीची किंमत 67 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे .999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 54,284 रुपये आहे
 
या आठवड्यात पुन्हा एकदा सोन्याच्या दरात साप्ताहिक वाढ नोंदवण्यात आली. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात घट दिसून आली. मात्र पुन्हा एकदा भावांनी 54 हजारांचा आकडा पार केला आहे.  
 
या आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोमवारी सोन्याचा भाव 54,126 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता.   मंगळवारी दर 54,180 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत वाढले. बुधवारी सोन्याचा भाव 54,704 रुपये आणि गुरुवारी 54,763 रुपयांवर बंद झाला .शुक्रवारी किमती 54,284 वर बंद झाल्या. शुक्रवार वगळता संपूर्ण आठवडाभर सोन्याच्या दरात तेजी होती
 
 
Edited by - Priya Dixit