1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

गुगलने बातम्यांद्वारे कमावले 4.7 अब्ज डॉलर, पत्रकारांना भागीदारी देण्याची मागणी

Google earned 4.7 bn dollar
गुगलने मागील वर्षी म्हणजे 2018 मध्ये बातम्यांद्वारे तब्बल 4.7 अब्ज डॉलर अर्थात सुमारे 32,900 कोटींचे उत्पन्न मिळविले आहे. गुगलने ही कमाई सर्च आणि बातम्यांद्वारे मिळवली आहे. ही माहिती न्यूज मीडिया अलायंसच्या एका रिर्पोटावर आधारित आहे.
 
गुगलने बातम्यांद्वारे केलेली कमाई अमेरिकेच्या मागील वर्षी न्यूज इंडस्ट्री जाहिरातीद्वारे झालेल्या एकूण खर्चासमान आहे. अमेरिकेत मागील वर्ष न्यूज इंडस्ट्रीने डिजीटल जाहिरातींवर सुमारे 5.1 बिलियन डॉलर म्हणजे सुमारे 35,438 कोटीं रुपये खर्च केले होते. तसेच गुगलने माध्यम समूहांच्या ऑनलाईन जाहिरातींचा मोठा भाग स्वत:कडे ओढून घेतला आहे. त्यामुळे अनेक माध्यम समूहांच्या उत्पादनात घट झाली आहे.
 
न्यूज मीडिया अलायन्स अमेरिकेतील 2 हजार वृत्तपत्रांचे प्रतिनिधित्व करते. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ‘एनएमए’चे अध्यक्ष डेव्हिड चॅवेर्न यांनी म्हटले आहे की, बातम्या हा गुगलच्या उत्पन्नाचा मोठा भाग आहे. पत्रकारांनी उभ्या केलेल्या बातम्यांच्या मजकुरातून गुगलला 4.7 अब्ज डॉलरचा कट मिळाला आहे. म्हणून गुगलच्या या कमाईचा काही भाग पत्रकारांना देण्यात आला पाहिजे.
 
रिर्पोटप्रमाणे जानेवरी 2017 ते जानेवारी 2018 पर्यंत न्यूज पब्लिश करणार्‍या वेबसाइटवर गुगलमुळे येणारे ट्रॅफिक दर आठवडा 25 टक्के अर्थात 1.6 बिलियन विजिट असे आहे. या रिर्पोटमध्ये गुगल क्लिकमुळे यूजर्स डेटाहून मिळणारी कमाई जोडण्यात आलेली नाही असा दावा एनएमएने केला आहे.
 
रिर्पोटप्रमाणे गुगलच्या ट्रेंडिंग विचारणांमधील 40 टक्के क्लिक बातम्यांसाठी असतात. यानंतर गुगल लोकांना सर्चच्या हिशोबाने वेबसाइट्सहून बातम्या प्रदान करतं. गुगल बातम्यांचा जो मजकूर वापरते त्यासाठी ती काहीही खर्च करीत नाही.