शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

गूगलने आणले नवीन 40 पेक्षा अधिक देवनागरी फाँट्स

आता गूगलने 40 पेक्षा अधिक देवनागरी फाँट्सची भेट टंकलेखकांना दिली आहे. यामुळे देवनागरीत टाइप करणं आणखी सोपं होऊन त्यामध्ये पर्याय मिळणार आहेत. त्यांमध्ये सेरीफ, सॅन सेरीफ, हस्तलिखिता सदृश्य अशी विविधता आहे. हे टंक ओपन सोर्स आहेत. हे फाँट सध्या गुगल डॉक्ससाठी तसेच तुमच्या वेबसाइट आणि ब्लॉगमध्ये वापरता येतील. 
 
नवे फाँट्स असा वापरा 
1) देवनागरी फॉंट (टंक) वापरायचे असतील तर सर्वप्रथम गुगल डॉक्समध्ये जा. 
2) आता नवीन डॉक्युमेंट तयार करा. फॉंटचा पर्याय निवडा... अधिक फॉंट हा पर्याय निवडा.
3) त्यानंतर स्क्रिप्टमध्ये देवनागरी हा पर्याय निवडा.
4) येथे तुम्हाला नवे फाँट्स दिसतील, त्यापैकी तुम्हाला हवा तो फाँट निवडून डाऊनलोड करा.
5) त्यानंतर तुम्हाला टाइप करताना हवा तो फॉंट निवडा. फॉंट द्वैलिपिक असतात, त्यामुळे मराठी टंकलेखनासाठी बराहा किंवा अन्य कुठले सॉफ्टवेअर वापरत नसाल तर टूलबारमधील मराठीच्या म वर क्लिक करा.